ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोवक्सीन लसीचा पुरवठा करा.माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनातून मागणी

77

देवानंद जांभूळकर जिल्हा प्रतिनिधी आरमोरी:- गेल्या आठ दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र देलनवाडी भाकरोडी व प्राथमिक आरोग्य पथक कुरडी माल पळसगाव येथे कोवॅक्सील लसीचा पुरवठा न झाल्याने सदर केंद्रावरील लसीकरण ८ दिवसांपासून बंद असुन हे केद्र आदिवासी उपयोजन क्षेत्रातील आहेत त्यामुळे तात्काळ आरोग्य केंद्रात कोवक्सील लसीचा पुरवठा करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनातून मागणी केली आहे.

आरमोरी तालुक्यातील आदिवासी वहुल क्षेत्रांतील नागरीकांना आरोग्याची सेवा चांगली मिळावी म्हणून शासनाने देलनवाडी भाकरोडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व कुरडी माल व पळसगाव येथे आरोग्य पथकाची निर्मिती करुण आरोग्याची सेवा रुग्णांना चांगली दिली जात असल्याने यावषात कोरोना विषाणुच्या पाथ्वभुमिवर आरोग्य केद्रात कोवीडचे लसीकरण करण्यात येत होते परंतु गेल्या आठ दिवसांपासून कोवक्सील लसचा पुरवठा आरोग्य केद्रावर झाला नसल्यामुळे लाबदुरुण आदिवासी भागातील नागरीक कोविडची लस घेण्यासाठी गेले असता लसीचा पुरवठा बंद झाल्याने गेल्या पावली वापस येण्याची वेळ नागरीकाना आली असतानाही अजुनही मोठ्या प्रमाणात नागरीक प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य पथक परीसरातील लसीकरणापासुन वंचित आहेत त्यामुळे शासनाने आरमोरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र देलनवाडी भाकरोडी व प्राथमिक आरोग्य पथक कुरडी माल पळसगाव येथिल लसीचा पुरवठा आठ दिवसांपासून बद आहे तर कोरची तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कोटगुल व बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रातही काल पासुन लसीचा साठा बंद असल्यामुळे शासनाने कोवॅक्सील लसीचा पुरवठा तात्काळ करावे अशी मागणी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या कडे माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी निवेदणातुन केली आहे.