विवाह खळबळजनक घटना लग्नात जास्त लोकांची संख्या आढळुन आल्याने ठोठावला 50 हजारचा दंड

गडचिरोली जिल्ह्यातील नगर पंचायतची पहिली घटना

0
728

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी नागपूर

 

अहेरी- लग्नास 25 जणांच्या उपस्थितीचा शासन निर्णय असतांना या निर्णयाचे उल्लंघन करून मर्यादेपेक्षा जास्त जणांच्या उपस्थितीत लग्न लावून कोरोना संसर्गास चालना देणाऱ्या अहेरी नगरपंचायतीअंतर्गत येणाऱ्या चेरपल्ली येथील नागरीकावर अहेरी नगरपंचायतीने शासनाच्या नियमानुसार तब्बल ५० हजार रूपयांचा दंड ठोठावल्याने खळबळ निर्माण झाली आहे .

यापुर्वी लग्नासाठी ५० जणांची मर्यादा आखून देण्यातआली होती . मात्र कोरोनाचा झपाटयाने प्रसार होण्यास लग्न समारंभात होणारी गर्दी कारणीभुत असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने लग्नावरील निर्बंध आणखी कठोर केले . लग्नास केवळ २५जणांची उपस्थिती ग्राह्य धरण्यात आली . तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वधु- वराच्या आई- वडीलावर ५० हजार रूपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला .

या बाबत आदेशही पारीत करण्यात आले . अहेरी तालुक्यातील चेरपल्ली येथील वार्ड क्रमांक १६ मध्ये काल आयोजित लग्नास ५० ते ७५ लोक उपस्थित होते . या बाबत माहिती मिळताच नगरपंचायतीच्या पथकाने पाहणी केली असता लग्नात नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसुन आल्याने सुरेश हनुमंत आत्राम यांच्यावर ५० हजारांचा दंड ठोठावला आहे .

शासनाच्या नवीन नियमानुसार अहेरी नगरपंचायतीने केलेली ही पहिली कारवाई असल्याचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साळवे यांनी सांगितले .