महाराष्ट्रात प्रवासासाठी पुन्हा एकदा ई- पासची तरतूद; जाणून घ्या कशी कराल नोंदणी

526

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत असणारे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले. यासोबतच प्रवासावरील निर्बंधही अधिक कडक करण्यात आले आहेत.

याच धर्तीवर राज्यात पुन्हा एकदा ई- पासची तरतूद करण्यात आली असून, त्यासाठी रितसर अर्ज करण्याची आवश्यकता असणार आहे.

*ई- पास मिळवण्यासाठी नेमकं काय करावे ?*

ई- पास मिळवण्यासाठी सर्वप्रथम, https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
ज्यानंतर इथं ‘apply for pass here’ या पर्यायावर क्लिक करावं.
पुढे तुम्हाला ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडावा.
आवश्यक कागदपत्र इथं जोडावीत.
प्रवास करण्यासाठीचं अत्यावश्यक कारणही नमूद करावं.
कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन तो अपलोड करावा.
पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तोच टोकन आयडी वापरुन ई- पास डाऊनलोड करु शकता.
या ई पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासचा वैधता कालावधी आणि क्यूआर कोड असेल.
प्रवास करतेवेळी पासची मुळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत बाळगा. जेणेकरुन पोलिसांनी विचारलं असता त्यांना हा पास दाखवता येऊ शकतो.

*ई-पास कोणाला मिळू शकेल ?*

अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा
एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणिबाणी
अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई- पासची आवश्यकता नाही.
कोणतीही व्यक्ती किंवा त्यांचा समूह या पाससाठी अर्ज करु शकतो.

ज्यांना ऑनलाईन सेवेसाठीचा ॲक्सेस मिळत नाही, अशा व्यक्तींनी सदर प्रक्रियेसाठी नजीकच्या पोलीस स्थानकाला भेट द्यावी. जिथं त्यांची मदत केली जाईल