चार वर्षा पूर्वी अमरावतीवरून चोरी गेलेल्या मोटारसायकल चा शहर वाहतूक शाखा अकोला ने लावला शोध

64

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

शहर वाहतूक शाखा अकोलाचे कर्मचारी अधिकारी लॉक डाऊन च्या कडक अंमलबजावणी करिता दिवसरात्र रस्त्यावर आहेत, रिकोर्डब्रेक कारवाया सोबत कागदपत्रे नसलेली व संशयास्पद वाहने सुद्धा चेक करीत आहेत.काही दिवसांपूर्वी नाकाबंदी दरम्यान शाहीन मोटारसायकल क्र MH27 AY 3239 ही मोटारसायकल शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चिकटे ह्यांनी चौकशी साठी थांबविली असता त्याचे कडे दुचाकींचे कागदपत्रे नसल्याने व दुचाकीवर टाकलेला क्रमांक हा अस्पष्ट दिसत असल्याने संशयावरून सदर दुचाकी वाहतूक कार्यालयात लावून त्यांनी सदरची माहिती पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांना दिली, त्यांनी ह्या बाबत अधिक माहिती घेतली असता सदर दुचाकी ही 22 मार्च 2018 रोजी अमरावती शहरातील गाडगे नगर भागातून चोरी गेल्याची माहिती मिळाली व ह्या बाबत दुचाकी मालक कपिल किसनराव सुखदेव राहणार वीटभट्टी वडाळी नाका अमरावती ह्यांनी दिलेल्या फिर्याद वरून दिनांक 23:03,:18 रोजी गाडगे नगर पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याची माहिती मिळल्यावरून शहर वाहतूक पोलीस अकोला ने नमूद दुचाकी मालकाचा फोन क्र प्राप्त करून त्यांना नमूद माहिती दिली तसेच गाडगे नगर पोलिसांना सुद्धा माहिती देण्यात आली, नुकतेच गाडगे नगर पोलिसांचे एक पथक फिर्यादी सह शहर वाहतूक शाखेच्या कार्यलयात आले असता पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी खात्री करून सदर दुचाकी त्यांचे ताब्यात दिली, ह्या उल्लेखनीय कार्या बद्दल पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांनी पोलीस निरीक्षक गजानन शेळके व ज्ञानेश्वर चिकटे ह्यांना एक हजार रुपये बक्षीस जाहीर करून कौतुक केले सदरची कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चिकटे ह्यांनी पार पाडली.