पुना प्रेस ऑनर्स चे व्यवस्थापक सुनील कदम यांचे निधन .

104

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे-दि पूना प्रेस ओनर्स अससोसिएशन लि.चे व्यवस्थापक
म्हणून गेली 30 वर्षापासून काम करीत असलेले कै. सुनील दगडू कदम वय 48 यांचे गुरुवार दि.22 एप्रिल 2021 रोजी कोव्हिडं ने रात्री 10 वाजता दुःखद निधन झाले.
त्यांचे मागे पत्नी .एक मुलगा आहे.
त्यांचे निधनाने प्रिंटिंग क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांनी संस्थेमध्ये आपले घर समजून काम केल्याने व त्यांचे मनमिळावू स्वभावामुळे ती इतरांना आदर्श व्यक्तीच वाटत होती. त्यामुळे कोणताही कार्यक्रम तसेच वर्धापनदिन असला की त्यांचे सहकार्य मुळे सर्व कार्यक्रम बहारदार होत असे ,जीवतोडुन संस्थेवर नितांत प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे कदम त्यांचा आदर्श इतर कर्मचारी वर्गाने घेण्यासारखा होता.
त्यांचे जाण्याने समस्थेचे कधीही भरून न येणारे मोठे नुकसान झालेले आहे.त्यांच्या कुटुंबावर तर हा मोठा आघात घडला आहे.त्यांचा अनेक संस्थांशी सबंध होता त्यापैकी पुणे विध्यार्थी गृह व इतर प्रिंटिंग संस्था यांच्यासोबत त्यांनी खूप जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केलेले होते.