फुटपाथवर राहणार्‍या आस्मा शेख हिचे दहावी शालांत परीक्षेत घवघवीत यश

162

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : अत्यंत गरीबी परिस्थिती राहण्यासाठी घर नाही आभाळच आपले घर आणि फुटपाथवर राहणार्‍या दुःखांचे चढ उतार पार करत आस्मा शेख हिने शाळांत परिक्षात घवघवीत यश मिळवले आहे. तिची ही कीर्ती , यश, जिद्द, चिकाटी, नवख्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल. अनेकदा अनुकूल वातावरणात सर्व सुविधा मिळवून ही विद्यार्थी पालकांच्या अपेक्षा भंग करतात तर अनेक विद्यार्थी असे आहेत जे परिस्थितीवर मात करत पालकांच्या स्वप्नांना पूर्ण करतात.
छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळ लिंबू पाणी विकणारे सलीम शेख यांची परिस्थिती हलाखीची आहे. डोक्यावर छत नाही दिवसभर लिंबू पाणी विकून कसा तरी आपला उदरनिर्वाह करायचा त्यात लॉक डाऊन मुळे ते खचून गेले आहेत. एकी कडे मुलगी दहावी शालांत परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
आस्मा शेख हिने आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की राहण्यास घर नव्हते तरी देखील बाबाने ताडपत्री लावली आणि आणि विद्युत पोल खाली अभ्यास केला. मला शाळेतील शिक्षकांनी पुस्तके दिली. मी खूप शिकणार आहे. आणि माझ्या पप्पा करिता एक हक्काचे घर घेणार आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांनी या गोष्टीची दखल घेऊन दुर्गा भोसले शिंदे यांच्यामार्फत मुलीला शालेय उपयोगी साहित्य देण्यात आले.