महाराष्ट्र पोलीस मित्र व नागरीक समन्वय समिती महाराष्ट्र राज्य कमिटीचे वरिष्ठ पदाधिकारी यांचा अभिनव उपक्रम…. श्री सुरेश गायकवाड आणि अँड. अरुण गायकवाड यांनी हाँस्पिटलला व्हेंटीलेटरची तातडीची गरज ओळखून मोशी येथील श्री मल्टी स्पेशालिस्ट हाँस्पिटलला सर्व सुविधायुक्त दोन व्हेंटीलेटर भेट….

0
68

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

महाराष्ट्र पोलीस मित्र व नागरीक समन्वय समिती महाराष्ट्र राज्य कमिटीचे वरिष्ठ पदाधिकारी श्री सुरेश गायकवाड आणि अँड. अरुण गायकवाड यांनी पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने काही हाँस्पिटलला व्हेंटीलेटरची तातडीची गरज आहे. हे ओळखून मोशी ( पिंपरी चिंचवड शहर हद्दीतील ) येथील श्री मल्टी स्पेशालिस्ट या हाँस्पिटलला अत्याधुनिक आणि सर्व सुविधायुक्त असे दोन व्हेंटीलेटर भेट म्हणून दिले. श्री सुरेश गायकवाड आणि अँड अरुण गायकवाड तसेच त्यांच्या संपूर्ण गायकवाड परिवाराने कोरोनाच्या लाँकडाउन काळात अनेक गरजुना अन्नधान्याची मदत केली आहे. तसेच मागील वर्षापासून त्यानी शोषित पिडीत आणि उपेक्षीत अशा व्यक्तींना जेवणाची व्यवस्था केली. अनेक कामगारांना त्यांनी त्यांचे संसार उध्वस्त होण्यापासून वाचवले आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी संपूर्ण गायकवाड परिवार देवदुतासारखा धावून जातो हा आदर्श आपल्या सर्व समाजापुढे त्यानी घालुन दिला आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाची प्रशंसा पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त श्री क्रुष्णप्रकाश साहेबानी मुक्त कंठाने केली आहे. महाराष्ट्र पोलीस मित्र व नागरीक समन्वय समिती महाराष्ट्र राज्य आणि इंडियन प्रेस कौन्सिल महाराष्ट्र राज्य गायकवाड परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.