शासनाच्या नियमाचे पालन करा अन्यथा दंडात्मक कारवाई करू – नगरपरिषद व कन्हान पोलीस प्रशासनांचे आवाहन.

62

 

कन्हान : – महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अति वेगाने वाढत कोरोनाच्या थैमानामुळे लोकांची परिस्थि ती अतिशय बिकट झाल्यामुळे राज्य शासनाने नवीन नियमावली जाहीर करण्यात आल्याने कन्हान-पिपरी नगरपरिषद क्षेत्रात सुध्दा लागु असल्याने नागरिकांनी शासन नियमाचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा दंडात्मक कारवाई करू – नगरपरिषद, कन्हान पोलीस प्रशासनांने आवाहन केले आहे.
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे राज्य शासनाने नियमावली कडक केली असुन जिल्हाधिकारीच्या आदेशान्वये कन्हान-पिपरी नगरपरिषद क्षेत्रात (दि.२२) एप्रिल २०२१ च्या रात्री ८ वाजता पासुन १ मे २०२१ पर्यंत आदेश लागु करण्यात आले असुन या कालवधीत किराणा दुकाने, दुध व दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला, फळे विक्री (फक्त व्दार वितरण),अंडी, मटण,चिकन, मासे, कृषी संबंधित सेवा दुकाने, पशुखाद्य, पेट्रोल पंपावर खाजगी वाहनां करिता पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी गॅस विक्रीव पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतु क, अत्यावश्यक सेवा मालवाहतुक याकरिता डिझेल विक्री कोरो०त .पुर्णतः बंद राहणार असुन जनतेने पालन करावे. हॉटेल, रेस्टॉरंट, बार यांना पिकअप सेवा देण्या स मनाई असेल
धार्मिक स्थळे, आठवडी बाजार, भाजीपाला, फळे बाजार बंद राहतील फक्त व्दार वितरणास मान्यता राहील. दारू दुकाने पुर्णतः बंद राहतील. टॅक्सी, कॅब, रिक्षा फक्त अत्त्यावशक सेवेकरिता चालु राहील. चार चाकी खाजगी वाहने फक्त अत्त्यावशक सेवेकरिता परवानगी राहील. दोनचाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्त्यावशक सेवेकरिता वापरास परवानगी राहील. सर्व खाजगी कार्यालये, कटिंग सलून, स्पा, ब्युटीपार्लर, शैक्षणिक संस्था, सर्व खाजगी शिकवणी वर्ग, स्टेडियम , मैदाने, चहाची टपरी, दुकाने पुर्णतः बंद राहतील. विवाह समारंभास बंदी राहील. अत्त्यावशक सेवा वग ळून सर्व प्रकारची दुकाने पुर्णतः बंद राहतील. सिनेमा हॉल, नाट्यगृह, सभागृह, संग्रहालय, सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा विष यक कार्यक्रम, सर्व प्रकारचे खाजगी बांधकामे, सेतु ई-सेवा केंद्र, आधार केंद्र, व्यायाम शाळा, स्विमिंग पुल, सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग, एवेनिंग वॉक, बेकरी, मिठाई दुकाने पुर्णतः बंद राहतील.
महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभुमी वर राज्य शासना द्वारे संचारबंदी लागु करण्यात आली आहे. सध्याचा परिस्थितित राज्यात, नागपुर जिल्हा व कन्हान शहरात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत नगरपरिषद क्षेत्रात राज्य शासनाच्या नवीन नियमाचे काठेकोरपणे पालन न करणा-या व्यापारी, दुकानदारांवर, नागरिकांवर व आस्थापनेवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ व ५६ आणि भारतीय दंड संहिता चे कलम १८८ अंतर्गत आवश्यक दंडात्मक कारवाई करण्यात येणार असुन कोणीही वि नाकारण घरा बाहेर पडु नये, गर्दीत जाऊ नये, अन्यथा दंडात्मक कारवाई करू असे आवाहन कन्हान-पिपरी नगरपरिषदचे मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे व कन्हान पोलीस स्टेशनचे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक, कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांनी केले आहे .