अलिबाग नगरपरिषदेचे कोरोना साखळी रोखण्याकरिता महत्वाचे पाऊल

124

 

(मिथुन वैद्य-अलिबाग प्रतिनिधी)

अलिबाग : अलिबाग नगरपरिषदेने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी खाजगी प्रयोगशाळा एरोहेड सर्व्हिसेस पनवेल, यांच्या सहकार्यातून अलिबागमधील ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे आज गुरुवार, दि. २२ एप्रिल पासून कोरोना चाचणी केंद्र सुरु केले आहे.
अलिबाग नगरपरिषद अध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या पुढाकारातून तसेच जिल्हाधिकारी निधी चौधरी , अलिबाग नगरपालिका प्रभारी. मुख्याधिकारी गोविंद वाकडे यांच्या सहकार्यातून हा उपक्रम आजपासून सुरु करण्यात आला आहे.
या केंद्रातून शासनाने ठरवून दिलेल्या दरात रॅपिड अँटीजेन, आरटीपीसीआर, कोविड अँटीबॉडी अशा विविध वैद्यकीय तपासण्या नागरिक करून घेऊ शकणार आहेत.
तरी अधिक अधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी निधी चौधरी तसेच अलिबाग नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी गोविंद वाकडे यांनी केले आहे.

दखल न्यूज भारत.