नवरगाव नदी घाटावरून अवैध रेतीचे उत्खनन-महसूल विभागाचे दुर्लक्ष मातब्बर यांच्या आशिर्वादाने रेती तस्कर झाले गब्बर

0
102

 

दिनेश बनकर
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत

ब्रम्हपुरी- गत सहा महिन्यांपासून तालुक्यात संपूर्ण रेती घाटाचे शासकीय नियमानुसार लिलाव झाले नसताना अरेरे नवरगाव नदी घाटावरून पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरणे अवैध रेतीची वाहतूक केली जाते.
ब्रम्हपुरी तालुक्यातून वाहणाऱ्या नदीची रेती पंचक्रोशीत प्रसिद्ध असून येथील रेती नागपूर, अमरावती, वर्धा, अकोला आदी ठिकाणी रेतीची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दरवर्षी रेतीघाटाचा शासकीय नियमानुसार लिलाव करण्यात येते. मात्र गत सहा महिन्यांपासून अशी कुठलीही प्रक्रिया झाली नाही.
तरी अवैधरीत्या रेतीचे उत्खनन करून रेती तस्कर शहरात विविध कामासाठी मोठ्या प्रमाणात रेती पुरवीत आहेत याकडे महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जाते.
सद्या पावसाळा सुरू असून तालुक्यातील अनेक रेती घाट पावसामुळे बंद आहेत.
मात्र अरेर नवरगाव नवरगाव नदीपात्रात अजून पाणी नसल्याने तेथील रेती अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
रात्रीच्या प्रहरी ट्रॅक्टरणे नदीपात्रातील रेती काढून पहाटेच्या सुमारास अनेक अवैध रेती तस्करी ट्रॅक्टरणे ब्रम्हपुरी शहरात नव्हे तर तालुक्यात साखर झोपेत असताना संधीच सोन करत मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या रेती विविध कामांसाठी पोहोचविली जाते. एका ट्रॅक्टर मागे वाजवीपेक्षा जास्त किमतीने रेती विकली जात असून राजकीय मातब्बर यांच्या आशिर्वादाने अवैध रेती तस्कर गब्बर झाले आहेत या कडे महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.