दक्षिण मुंबई भटके विमुक्त आघाडी अध्यक्षपदी अनंत कोटकर यांची निवड कोटकर यांच्या रूपाने भाजपने दिला गवळी समाजाला न्याय : चंद्रकांत भोजने

69

 

प्रतिनिधी : (ओंकार रेळेकर)

चिपळूण : दक्षिण मुंबई भटके विमुक्त आघाडी अध्यक्षपदी अनंत कोटकर यांची भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी निवड केली आहे ही गवळी समाज बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे गवळी समाज बांधवांसाठी पोटतिडकीने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया प्रतिष्ठित उद्योजक गवळी समाजाचे नेते चंद्रकांत भोजने यांनी व्यक्त केली.
श्री .भोजने पुढे म्हणाले आमचे स्नेही अनंत रघुनाथ कोटकर हे गेल्या अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रांमध्ये प्रत्येक कार्यामध्ये तळमळीने काम करीत आहेत,महाराष्ट्र यादव चारिटेबल ट्रस्ट शाखा संगमेश्वर ची पुनर्बांधणी झाली तेव्हा कोटकर यांचा फार मोठा सिंहाचा वाटा होता.
पश्चिम विभाग गवळी समाज मंडळाचे ते फाउंडर मेंबर्स आहेत .गेली १३ वर्षे मंडळाला सतत सहकार्य त्यांचे लाभले आहे. गेली वीस -पंचवीस वर्ष सामाजिक कार्य करत असताना कोणताही मनात गर्व मोठेपणा किंवा कोणत्याही गोष्टीचा चुकीचा गैरसमज झाला तर समजुतदारपणा घेऊन निर्णय घ्यायचे परंतु सामाजिक संस्था, मंडळा बरोबर ते एकनिष्ठ राहिले. काही गोष्टी त्यांना पटले नाही तर ते शांत राहायचे पण मंडळाच्या विरोधात काही कारवाई करत नसत किंवा मंडळाच्या चुकीचा संदेश कधीच देत न्हवते अशा समजूतदार व प्रामाणिक मंडळासोबत एकनिष्ठ असलेल्या समाज बांधवां चे दक्षिण मुंबई जिल्हा भटके-विमुक्त आघाडी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून भोजने यांनी पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देऊन आपणही कोटकर यांच्या खांद्याला खांदा लावून गवळी समाज बांधवांच्या प्रगतिकरिता काम करणार असल्याचे भोजने यांनी सांगितले,
महाराष्ट्र यादव चॅरिटेबल ट्रस्ट संगमेश्वर शाखेचे सदस्य व पश्चिम विभाग गवळी समाज मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते अनंत कोटकर यांची दक्षिण मुंबई भटके
विमुक्त आघाडीच्या अध्यक्षपदी
नुकतीच निवड करण्यात आली आहे.कोटकर यांच्या निवडीची बातमी कळताच चिपळूण ,संगमेश्वर देवरुख येथील गवळी समाज बांधव आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे,कोटकर यांची भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी ही नियुक्ती केली
आहे, भटक्या ,विमुक्त जाती आणि गवळी समाज बांधवांच्या सामजिक ,कार्यासाठी न्याय हक्कासाठी आपण यापुढे पूर्वी पेक्षा अधिक जोमाने काम करणार असल्याचे अनंत कोटकर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

*दखल न्यूज भारत.*