देलनवाडी ग्रा.प.च्या ग्रामसेवकांकडे असलेला कुरडी ग्रा.प‌.चा अतिरीक्त पदभार काढण्यात यावा. अन्यथा तिव्र आंदोलन गावकऱ्यांचा संवर्गविकास अधिकारी यांना निवेदनातून इशारा.

198

 

देवानंद जांभूळकर जिल्हा प्रतिनिधी

आरमोरी :- पंचायत समिती अंतर्गत देलनवाडी या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना पंचायत समिती स्तरावरुन स्वमर्जिने कुरडी माल येथील ग्रामपंचायत चा अतिरीक्त पदभार दिल्याने देलनवाडी गट ग्रामपंचायत चा सर्वांगिण विकास खुंटला असुन नागरीकांना शासकीय कामासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या दाखल्यासाठी अडचणी निर्माण झाल्या असल्याने देलनवाडी येथील ग्रामसेवकांकडे असलेला कुरडी माल ग्रामपंचायतीचा पदभार सात दिवसांच्या आत काढण्यात यावा अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी पंचायत समिती संवर्ग विकास अधिकाऱ्याला निवेदनातून दिला आहे.

आरमोरी तालुक्यातील देलनवाडी ग्रामपंचायत हद्दीत तिनं हजाराच्या वर लोकसंख्या असल्यामुळे ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ग्रामसेवक माकडे याची देलनवाडी येथे स्थाई ग्रामसेवक म्हणुन नियुक्ती असताना देलनवाडीचे स्थाई ग्रामसेवक माकडे यांच्या कडे अतिरिक्त कुरडी माल ग्रामपंचायतीचा कारभार सर्वगविकास अधीकारी यांनी दिल्याने माकडे ग्रामसेवक याचा स्थाई ग्रामपंचायत देलनवाडी येथे दुर्लक्ष होत असल्यामुळे कोसरी देलनवाडी येथील ग्रामस्थांचे कार्यालयीन कामे प्रलंबित आहेत तसेच त्यांच्याकडे ज्या अतिरीक्त कुरडी ग्रामपंचायत चा कारभार देण्यांत आला तिही ग्रामपंचायत दोन हजाराच्या वर लोकसंख्या असल्यामुळे त्यांना दोन्ही ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळु शकत नाहीं त्यामुळे देलनवाडी येथील ग्रामसेवकांकडे असलेला कुरडी ग्रामपंचायतचा अतिरीक्त पदभार सातदिवसाच्या आत काढण्यात यावे अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कोसरी देलनवाडी येथील ग्रामस्थांनी दिला आहे.