तहसीलदार परीक्षित पाटील यांचा पाथरी पाहणी दौरा

256

सावली (सुधाकर दुधे )
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता आज सावली तालुक्याचे तहसीलदार मा. पाटील साहेब नायब तहसीलदार कांबळे साहेब तथा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी तालुक्यातील पाथरी येथे भेट दिली.
पाथरी परिसरातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या बघता पाथरी येथे 3 व्यक्तीचा मृत्यू झाला त्यात एक 24 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला. त्या अनुषंगाने पाथरी तथा परिसरातील परिस्थिती बिकट होऊ नये यासाठी मा. तहसीलदार साहेब यांनी पाथरी ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच तथा पदाधिकारी तथा सायखेडा उसरपार चक येथील पदाधिकारी तसेच आरोग्य वर्धिनी केंद्र पाथरी येथील वैद्यकीय अधिकारी तथा कर्मचारी यांची बैठक घेऊन कोरोनाच्या संधर्भात सूचना केल्या, जनतेमध्ये जनजागृती करण्याचे आव्हाहन करून कोरोना चाचणी तथा लसीकरण वाढविण्याच्या अनुषंगाने लोकांना जागृत करून प्रोत्साहित करण्यास सांगितले. तसेच तहसीलदार साहेब यांनी पाथरी नगरीत स्वतः फिरून गावाची पाहणी केली. मेडिकल व्यावसायिकांना योग्य मार्गदर्शन करून सूचना करण्यात आल्या. कोरोनाची परिस्थिती सध्या बिकट असून नागरिकांना सर्दी ताप खोकला असल्यास घरीच न राहता पाथरी येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात जाऊन स्वतःची कोरोना चाचणी करून घेण्यात यावी व स्वतःची काळजी घ्यावी तथा विनाकारण बाहेर फिरू नये अत्यावश्यक काम असल्यास तोंडाला मास्क लावून बाहेर पडावे स्वतःची काळजी घेण्याचे आव्हाहन पाथरी येथील ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आले. कोरोनाच्या काळात पाथरी ग्रामपंचायत जनतेची काळजी घेत असून नागरिकांणि कोरोनाचे लक्षण आढळल्यास स्वतःहून पुढे येऊन कोरोना चाचणी करण्याच्या सूचना वारंवार करीत आहे. गावामध्ये फवारणी केल्या जात आहे. कोरोनाच्या बाबतीत कुठल्याही अफवांना बळी न पडण्याचे आव्हाहन पाथरी ग्रामपंचायत ने केले आहे.