१२ एप्रिल च्या अपघातातील गंभीर जखमी पोलीस शिपायाचा मृत्यू . 9 दिवस मृत्यूशी झुंज देत अखेर उपचारादरम्यान निधन.

844

 

उपसंपादक /अशोक खंडारे

चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस शिपाई गजानन ठाकूर वय (36 )वर्ष अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर नागपूर येथील दवाखान्यात उपचार चालू असताना आज त्यांचे दुःखद निधन झाले.

12 एप्रिल च्या मध्यरात्री नाकाबंदी साठी आष्टी येथील वनविभागाच्या तपासणी नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपाई गजानन ठाकूर यांना गोंडपीपरी कडून येणाऱ्या मिनी ट्रॅक ने जोरदार धडक दिली यात ते गंभीर जखमी झाले.त्यांना लगेच चंद्रपूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले.परंतु त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना नागपूर येथील दवाखान्यात पुढील उपचारासाठी नेण्यात आले होते परंतु अखेर 9 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या या पोलीस शिपायाचे उपचारादरम्यान निधन झाले.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच आष्टी पोलीस स्टेशन मध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले. सदर नायक पोलीस शिपाई यास शहीदाचा दर्जा देऊन शासकीय मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.त्यांच्या अपघातानंतर आष्टी पोलीसांनी आपापल्या परीने मदत केली आहे.
ते मूळचे चंद्रपूर जिल्ह्यतील गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी असून त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील असा बराच आप्त परिवार आहे.