आँक्सिजन प्लांट सोबतच कायम सेवेतील कुशल तंत्रज्ञ नेमण्याची समविचारीची मागणी

100

 

प्रतिनिधी : गौरव मुळ्ये.

*रत्नागिरीः* रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय सह सुमारे सहा आँक्सिजन प्लांट उभारण्याची घोषणा झाली आहे.रत्नागिरीत प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली आहे.कोरोना रुग्णांच्या जीवन मानाला आवश्यक निर्णय घेणाऱ्या आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाला महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने धन्यवाद देण्यात येत आहेत.
नियोजित आँक्सिजन प्लांटच्या उभारणीसाठी लागणारा कुशल तांत्रिक कर्मचारी ज्या प्रमाणात उपलब्ध होतो त्या प्रमाणात उभारलेल्या प्लांटची दैनंदिन निगा,सतत देखभाल,वापरातील येणाऱ्या त्रुटी,जोडणी,या सर्व गोष्टींसाठी सतत सतर्क कर्मचाऱ्यांची तैनात हवी असे यातील व्यक्तींचे म्हणणे आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता भविष्यात आँक्सिजन प्लांटची नितांत गरज राहील आणि आहे.खरे तर जिल्हास्तरावर अशा प्लांटची निर्मिती यापूर्वीच व्हायला हवी होती.तरी यासाठी आवश्यक कुशल तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूक प्लांट सोबतच करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचचे सर्वस्वी बाबा ढोल्ये,श्रीनिवास दळवी,संजय पुनसकर,रघुनंदन भडेकर,अँड.निलेश आखाडे,आनंद विलणकर आदींनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

दखल न्यूज भारत