कु.साक्षी ठाकरेचे दैदिप्यमान यश……. मंगरुळपीर तालुक्यातुन दहावित प्रथम येन्याचा मीळवला मान आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवर्‍या साक्षिचे सुयश

 

फुलचंद भगत
मंगरुळपीर-लहानपणापासुनच जिद्दी असलेली आणी चिकाटी व सातत्याने अभ्यासामध्ये प्रगती करणारी सामान्य कुटुंबातल्या साक्षीने नुकत्याच लागलेल्या दहाविच्या परिक्षा निकालामध्ये ९८.८०% गुण मिळवुन आपल्या दैदित्यमान यशाने मंगरुळपीर तालुक्यातुन प्रथम येन्याचा साक्षिने सन्मान राखुन मानाचा तुरा खोवला आहे.
मुलीला दुय्यम दर्जा देणार्‍या समाजात मुलीच कशा शिक्षणामध्ये अव्वल आहेत हे प्रेरणादायी ऊदाहरण वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर या ठिकाणी पाहावयास मिळत आहे.नुकत्याच लागलेल्या दहावी बोर्डाच्या परिक्षेच्या निकालामध्ये नाथ विद्यालयाची विद्यार्थीनी कु.साक्षी भाष्करराव ठाकरे हिने ९८.८०% गुण मिळवुन नेञदिपक यश संपादन केले आहे त्यामुळे तालुक्यातुन प्रथम येन्याचा मानही साक्षीलाच जात आहे.
शिक्षणात ध्येयवेडी असलेली साक्षी बालवयापासुनच आपल्या आईवडीलांच्या कष्टाची जाण ठेवुन शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिररीने सहभाग घेवुन यश खेचुन आणत होती.शिक्षणच माणसाला तारु शकते ही खुनगाठ मनाशी बांधुन समाजाप्रती जे देनं लागते या सामाजीक भावनेने प्रेरीत झालेली साक्षी मोठ्या पदावर आरुढ होवुन सेवाभावी कार्य करन्याचे स्वप्न ऊराशी बाळगुन अभ्यास करत होती.या तिच्या जिद्द व चिकाटीला अखेर यश येवुन नुकत्याच लागलेल्या दहावीच्या परिक्षेमध्ये ९८.८०% गुण मिळवुन तालुक्यातुन प्रथम येन्याचा मान मिळवला आहे.वाचन,वकृत्व तसेच कविता लिहिन्याचा छंद जोपासणार्‍या साक्षीच्या या यशाने तिच्या आईवडील आणी भावडांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मुलाप्रमाणेच मुलीला मानुन ठाकरे कुटुंबाने आपल्या दोनही मुलींना ऊच्चशिक्षित बनविले असल्याने साक्षीला देखील मोठ्या पदावर आरुढ होन्याचं स्वप्न असल्याचे साक्षिच्या आईवडीलांनी सांगीतले.मनमिळावु स्वभाव आणी शिक्षणातली गोडी बघुन बहिणीही नेहमी प्रेरणा देतात असे सांगुन आपल्या यशाचे खरे श्रेय हे प्रथमतः आईवडीलांनाच देईल आणी नेहमी शिक्षणात गोडी निर्माण करणार्‍या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे यश मिळू शकले असे साक्षिने सांगीतले.ईतरांनीही या ठाकरे कुटुंबियांची प्रेरणा घेवुन मुलींना शिकवुन मोठ्या पदावर पोहचवुन स्वबळावर ऊभे राहन्याची प्रेरणा घ्यावी हेच यानिमीत्ताने अधोरेखित होत आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
9763007835