वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची बुलडाणा जिल्हा पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट विविध विषयावर चर्चा…

40

 

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांची अकोला दौऱ्याप्रसंगी यशवंत भवन येथे बुलडाणा जिल्हा पदाधिकारी यांनी भेट घेतली
यावेळी जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे, जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक विषयावर व पक्षवाढ़ी संदर्भात बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली
तसेच पक्ष संघटन मोठ्या प्रमाणात वाढवावे व जनतेच्या न्याय हक्कासाठी कार्य करावे यासाठी वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सोबत आहे असे मार्गदर्शन बाळासाहेब आंबेडकर यानी यावेळी केले
याप्रसंगी जिल्हा संघटक भाऊराव उमाळे,युवानेते धम्माभाऊ नितनवरे, वाहिद जमा यांची उपस्थिति होती