काग (सोनेगाव) येथील रेती घाटावर भारतीय क्रांतिकारी संघटनेतर्फे धरणे आंदोलन व बेमुदत साखळी उपोषण

62

 

भारतीय क्रांतिकारी संघटनेतर्फे चंद्रपुर जिल्ह्य़ातील चिमूर तालुक्यातील काग सोनेगाव येथे दिंनाक 20/4/2021 ठिक दुपारी 12.00 वाजेपासून धरणे आंदोलन व बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.
उपोषणातील मागण्यांमध्ये सन 2021 काग सोनेगाव रेती घाट लिलाव प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी, मौजा काग (सोनेगाव) येथील रेती घाटातील अंदाजे 80 लाख रूपयांची किंमतीची रेती चिमूर तहसीलदार, तलाठी व इतर 20 ट्रॅक्टरच्या अनोळखी चालक मालक याचें संगनमताने अवैधरीत्या रेती तस्करी करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, रेती घाट लिलाव प्रक्रियेत नियमबाह्य अधिकाराचा वापर करून झालेल्या भ्रष्टाचारात सहभागी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, शेतकऱ्यांच्या पांदन रस्त्यावरून ओव्हरलोड रेतीची वाहतूक करीत असल्याने, झालेल्या पिकाची नुकसान भरपाई करण्यात यावी अशा मागण्या आहेत. जो पर्यंत अवैधरीत्या रेती तस्करी थांबवली जात नाही, नियमबाह्य भ्रष्ट बेजबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई होत नाही व मागण्या मान्य केल्या जाणार नाही तोपर्यंत उपोषण आंदोलन सूरू राहील असे उपोषणकर्ते कैलाश भोयर, सांरग दाभेकर यानीं म्हटले.
कैलाश भोयर, सांरग दाभेकर यानीं गावातील प्रोत्साहित महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना रेती घाट देण्यात यावा यासाठी 13/10/2020 ला लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रस्ताव दाखल केला जेणेकरून गावातील बेरोजगार महिला, पुरुषांना रोजगार मिळावा, मात्र अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे महिला गटाला डावलून खोटे कागदपत्रे जोडून अवैधरीत्या रेती घाट लिलाव करण्यात आले. याचाच अर्थ जिल्ह्य़ातील इतर रेती घाटाचा लिलाव अवैधरीत्या केल्याचा आरोप केला.
उपोषणाला भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा, उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा, नागभीड शहर उपाध्यक्ष विशाल भसारकर व स्थानीक शेतकरी, नागरिकांनी सहभाग दर्शवला.