शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम उपलब्ध करून द्य युवासेना उपतालुका प्रमुख नंदू पाटील निकोले यांची मागणी

140

 

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे):-दर्यापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मागील पिकाचा पीक विमा मिळाला नाही तरी लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या अशी मागणी युवा सेना उपतालुकप्रमुख नंदू पाटील निकोले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
मुंग आणि उडीद हे पिक खरीपामध्ये प्रामुख्याने घेतले जाते परंतु निसर्गाच्या असमतोलपणामुळे
शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिसकल्या गेला. शेतकऱ्यांनी फार आशेनं पिक विमा काढला की पिक विम्याच्या माध्यामतन आपल्याला मदत होईल परंतु अजून पर्यंत शेतकरी बांधवांना त्यांच्या हक्काचं ऐक पैसा पण त्यांच्या खात्यामध्ये अजून पर्यंत आला नाही.तरी हे शेतकऱ्यांच्या हक्काचं पैसा लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा करावे अशी मागणी युवा सेना उपतालुका प्रमुख नंदू पाटील निकोले यांनी केली आहे.