कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने भिवखिडकीच्या सिमा बंद

 

प्रतिनिधी
राहुल उके
दखल न्यूज

अर्जुनी मोर,दि.30ः- तालुक्यातील भिवखिडकी येथील व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्याने भिवखिडकी गावाला कंटेनमेंट घोषित करण्यात आले.तर भुरशीटोला, बीडटोला व गंगेझरी ( रिठी ) ही गावे बफर झोन म्हणून प्रतिबंधित क्षेत्रात समाविष्ट करण्याचे आदेश अर्जुनी-मोरच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी काढले.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी येथील मूळनिवासी व्यक्ती 20 जुलै रोजी देहू-आळंदी पुणे येथून खाजगी वाहनाने प्रवास करून आल्याने सदर व्यक्तीस भिवखिडकी येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. सदर व्यक्तीचे 26 जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगावबांध येथे घशाचे नमुने घेऊन कोवीड केअर सेंटर गोंदिया येथे पाठविण्यात आले होते. सदर व्यक्तीचा अहवाल 28 जुलै रोजी प्राप्त झाला असून सदर व्यक्ती कोरोना बाधित आढळून आला आहे. प्रादुर्भाव इतर भागात पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व covid-19 विषाणूचा संसर्ग टाळण्याकरिता भिवखिडकी येथे कंटनमेंट घोषित करून लगतच्या गावांना बंपर झोन म्हणून प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. सदर प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आले आहे.