प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा साधेपनाने साजरा करा- रवी बेलुरकर यांचे आवाहन

45

 

विशाल ठोंबरे
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता श्रीराम जन्मोत्सव सोहळा घरीच साधेपनाने साजरा करण्याचे आवाहन प्रभू श्रीराम नवमी उत्सव समिती अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी सर्व रामभक्तांना केले आहे.
उद्या बुधवारी २१ एप्रिल ला प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव आहे. हा जन्मोत्सव मागील ५० ते ६० वर्षा पासून वणी शहरात मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत, परंतु सध्याची परिस्थिती वेगळी आहे,
दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव आपण पाहत असून त्यावर मात करण्या करीता संपुर्ण मानवजाती संघर्ष करीत आहे.
वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून
वणी शहर आणि वणी लगत सर्व गावांच्या श्रीराम भक्तांचे मागील १५ ते २० वर्षा पासून शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांनी व श्रीराम भक्तांनी उद्या २१ एप्रिल ला आपले आणि आपल्या परिवाराचे संरक्षणाकरीता आप आपल्या घरी साधेपणाने प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सव सोहळा साजरा करावा, कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडू नये आणि या कोरोनावर मात करून आपले सन साधेपणाने साजरे करावे असे आवाहन
प्रभू श्रीराम नवमी उत्सव समिती अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी केले आहे.