खंडाळा(घटाटे) येथे दोन गुटात मारपीट फिर्यादी यांचा तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला

50

 

पारशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत, नागपुर

*कन्हान* (ता प्र):- कन्हान पोलीस स्टेशन पासुन पुर्व दिशेस ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या खंडाळा (घटाटे )या गावात दोन गुटात मारपीट झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी बादल सिद्धार्थ शेंडे यांचा तक्रारी वरुन चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे .
कन्हान पोलीसां कडुन प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक १९ एप्रिल ला रात्री १० ते १०:१५ वाजता च्या सुमारास फिर्यादी बादल सिद्धार्थ शेंडे हा आपल्या मावस भाऊ याला घेऊन फिरायला गेला असता यातील आरोपी श्रीकांत वानखेडे याने फिर्यादी बादल सिद्धार्थ शेंडे याचा मावस भावाची गच्ची पकडुन व वर उचलुन खाली पाडले असता फिर्यादी बादल सिद्धार्थ शेंडे याने आरोपी श्रीकांत वानखेडे याला म्हटले कि माझ्या मावस भावाला का पाडले असे विचारले असता यातील आरोपी श्रीकांत वानखेडे याने फिर्यादी बादल सिद्धार्थ शेंडे याला हाथबुक्याने मारहण करुन अश्लील भाषेत माय बहीणीच्या शिव्या दिल्या व फिर्यादी बादल सिद्धार्थ शेंडे हा आपल्या मित्रासह गावतल्या हनुमान मंदिरा जवळ बसला असता यातील आरोपी श्रीकांत वानखेडे हा आपल्या तिघही भावांना घेऊन आला व यातील आरोपी (१)श्रीकांत वानखेडे , (२)नवरंग वानखेडे , (३)रजत वानखेड़े , व (४)आशिष वानखेडेसर्व राहणार खंडाळा(घटाटे) अश्या चार ही आरोपींनी संगमत करुन फिर्यादी बादल सिद्धार्थ शेंडे यास माराहण करीत असता फिर्यादीच्या काकाचे मुले हे मध्यस्ती करायला आले असता त्यांना सुद्धा चार ही आरोपींनी माराहण करुन माहारे , थेळे असे जातीवाचक शिवी देऊन चार दिवसात तुमचा मर्डर करतो अशी धमकी दिली . असे फिर्यादी बादल सिद्धार्थ शेंडे यांचा तक्रारी वरुन अपराध क्रमांक १६१/२१नुसार कन्हान पोलीसांनी आरोपी श्रीकांत वानखेडे , नवरंग वानखेडे , रजत वानखेड़े , व आशिष वानखेडे अश्या चार ही आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० च्या कायदा नुसार कलम २९४ , ३२३ , ५०६ , ३४ , व अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम कायदा १९८९ नुसार ३(१)( r) ,३(१)(s) ,३(२)(va) तहत गुन्हा दाखल केला असुन या घटनेचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांचा मार्गदर्शनात पोलिस उपनिरिक्षक जावेद शेख व पोलीस पुढील तपास करत आहे .