रास्त अन्नधान्यात वाढ करुन मोफत अन्नधान्य उपलब्ध करा BRSP चंद्रपूर जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पाईकराव यांची मागणी

177

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

दिनांक 19 एप्रिल 2021 रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा घुग्घुस च्या माध्यमातून प्रशासक तहसीलदार नगर परिषद घुग्घुस यांच्या मार्फत जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले की संपुर्ण महाराष्ट्रात वाढत्या कोरोना प्रादुर्भावा मुळे लॉकडाऊन करण्यात आले या लॉकडाऊन मुळे गोरगरिब जनतेला घराबाहेर जाऊन काम करणे अशक्य झालेले आहे अशा वेळेस रोजगार नसल्याने त्यांना उपास मारिची वेळ आलेली आहे तरी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे आपणांस अशी विनंती करण्यात येते की या गोरगरीब जनतेच्या बाबी विचारात घेऊन यांना आता जे रास्त धान्य मिळत आहे त्या रास्त धान्याची वाढ करून ते मोफत देण्यात यावे जने करुन कोणत्याही गोरगरिब जनतेला उपास मारीची वेळ येऊ नये अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या माध्यमातून करण्यात आली आहे.
निवेदन सादर करताना घुग्घुस शहर अध्यक्ष शरद पाईकराव, घुग्घुस उपाध्यक्ष मायाताई सांड्रावार, घुग्घुस शहर महासचिव अशोक आसमपल्लिवार, घुग्घुस सचिव जगदीश मारबते, घुग्घुस महिला आघाडी अध्यक्षा रमाबाई सातारडे, घुग्घुस युवा आघाडी अध्यक्ष ईश्वर बेले, युवा आघाडी उपाध्यक्ष दीपक दीप, अमराई वार्ड नं 1 अध्यक्ष इरफान पठाण,वार्ड नं. 2 अध्यक्ष राकेश पारशिवे, वार्ड नं. 3 अध्यक्ष आशिष परेकर, वार्ड नं. 4 अध्यक्ष पिंटू परेकर, वार्ड नं. 5 अध्यक्ष अरविंद चहांदे, वार्ड नं 6 अध्यक्ष अशोक भगत, करण कारबांदे, सचिन माहुरे, जोशनाताई डांगे, भाग्यश्री भगत, सोनु फुलकर, दत्ता वाघमारे, भावनाताई कांबळे, पारिखाताई कांबळे, रिनाताई निखाडे, संपूर्ण BRSP टिम उपस्थित होते