ग्रामपंचायत मारडा (मोठा) येथे घेण्यात आली लसीकरण मोहीम

149

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

मारडा गावामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या वारंवार पाठपुरावामुळे व डॉ. वाकदकर मुख्य वैद्यकीय अधिकारी घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा मार्गदर्शन ना नुसार दिनांक : २०/०४/२०२१ ला जिल्हा परिषद शाळा येथे कोविड-19 लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला. एकूण 150 लसीचे उद्दिष्ट देण्यात आले होते त्यानुसार 100 % लसीकरण उद्दिष्ट पूर्ण झाले.
या कार्यक्रमाला गावाचे सरपंच गणपत चौधरी , उपसरपंच बालनाथ काळे , ग्रामपंचायत सदस्य सुभाष पिंपळशेंडे , ग्रामसेवक राजु पिदुरकर , व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्यांनतर गावातील एकूण 150 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. सदर कार्यक्रमाला जि,.पं.सदस्य ब्रिजभुषण पाझारे यांनी श्री.घुलाराम गणपती झाडे यांना लसीकरण झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाला सदिच्छा दिल्या .
हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता अश्विनी कोडापे ( सी.एच.ओ.) , एस.डी.सहारे ( आरोग्य सेविका ) , श्री.प्रफुल पराते (आरोग्य सेवक ), सौ.ज्योती वाकुलकर (ANM ) सौ.प्रतिभा चौधरी , सौ छाया चौधरी (आशा वर्कर) , निकिता वाकुलकर ग्रामपंचायत सदस्या , राहुल ठावरी (संगणक परिचालक), भुवनेश्वर गोरे , मारोती राजूरकर (ग्रामपंचायत कर्मचारी ) यांनी प्रामुख्याने मेहनत घेतली व गावातील नागरिकांनी लसीकरणाकरीता लक्षणीय उपस्थिती दर्शवल्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.