कोविड रुग्णांना बेड, ऑक्सीजन सिलेंडर, व्हेंटिलेटर बेड व रेमडेसीवर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात यावे:- राजु झोडे

63

दख़ल न्यूज़ भारत:शंकर महाकाली

बल्लारपुर : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यात कोविड रुग्णांना बेड, ऑक्सीजन सिलेंडर, व्हेंटिलेटर बेड तथा रेमडेसीवर इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे कित्येक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. दररोज नवीन रुग्णांना बेड मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून यावर तात्काळ उपाय योजना करण्यात यावी व रुग्णांचा जीव जाण्यापासून वाचवावे करिता वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.
जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्याकरिता जिल्ह्यात जम्बो कोविड सेंटर उभारण्यात यावे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात वेंटीलेटर आहेत. तेथील पालकमंत्र्यांनी व जिल्हाधिकाऱ्यांनी निधीचा योग्य वापर करून व्हेंटिलेटर तथा अन्य आरोग्य सुविधा पुरविल्या आहेत.परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी व प्रशासनाने याबाबत कोणतीही उपाययोजना केलेली दिसत नाही. खाजगी रुग्णालयात अत्यल्प वेतनावर आरोग्य कर्मचारी काम करतात अशा कर्मचाऱ्यांना जादा वेतन देऊन आरोग्यसेवेत दाखल करून त्यांचा उपयोग करण्यात यावा. ऑक्सीजन सिलेंडरचा तुटवडा भरून जास्तीत जास्त ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच रेमडेसीवर इंजेक्शन याचा होणारा काळाबाजार रोखून जास्तीत जास्त इंजेक्शनचा पुरवठा जिल्ह्यात करून गरीब रुग्णांपर्यंत मोफत पोचवण्यात यावा . चंद्रपूर जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात रेमडेसिवर इंजेक्शनची आवश्यकता आहे. परंतु इंजेक्शनचा काळाबाजार होत असून गरीब व सर्वसामान्य रुग्णांना इंजेक्शन मिळत नाही आहे तर श्रीमंत घरातील रुग्णांना काळाबाजार करून वीस हजार रुपयापर्यंत इंजेक्शन उपलब्ध होत आहे. श्रीमंत लोकांना पैशामुळे इंजेक्शन तात्काळ मिळत आहे तर गरीब व मध्यमवर्गीय यांना इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे जीव गमवावा लागत आहे असा आरोप राजू झोडे यांनी केला. रेमडेसिवर इंजेक्शन तयार करणाऱ्या कंपन्यांना सूट देऊन जास्तीत जास्त पुरवठा करण्याची मोकळीक देण्यात यावी. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर बेड, ऑक्सीजन बेड,रेमडेसीवर इंजेक्शन तथा अन्य उपयोगी संसाधने कोविड रुग्णांना उपलब्ध करून देण्यात यावे अशा मूलभूत मागण्यांना घेऊन वंचित बहुजन आघाडी तर्फे माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.