बेलोरा- नायगाव कोळसा खानीत कामगारांची कोवीड तपासणी 240 कर्मचाऱ्यांची कोवीड तपासणी

140

 

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

वेकोली वनी क्षेत्राच्या निलजई उपक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बेलोरा नायगाव या खुल्या कोळसा खाणीत खान प्रबंधक राजकिशोर आचार्य यांच्या मार्गदर्शनात खाणीतील अधिकारी तथा कामगारांची कोविड तपासणी करण्यात आली. यात खाणीतील 240 अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी आपली तपासणी करून घेतली. ह्या तपासण्या करण्यासाठी वणी येथील कोविड तपासणी केंद्राचे सहकार्य लाभले.

सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येतही भर पडत आहे. अशा स्थितीत खाण कामगार कोरोना प्रादुर्भावापासून सुरक्षित राहावे यासाठी या तपासण्या करण्यात आल्या. याचबरोबर 45 वर्षावरील कामगारांना राजीव रतन हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे कार्य सुरू आहे. खाण क्षेत्रात करण्यात आलेल्या या तपासणीत सिनियर मॅनेजर (माईन)आर पी नाईक, सुरक्षा अधिकारी प्रशांत पाचपोर, खनन अभियंता संजय काळमेघ, कार्यालय अधीक्षक नारायण जांभूळकर, संजय किनेकर ,अरुण मेश्राम, सुनील बिपटे,राजू खोके, जीवन मत्ते, विशाल पिंपळकर, ज्ञानेश्वर लेडांगे, शालिनी रामटेके, शीतल कोंगरे , रेखा वाढई ,ललिता विधाते आदींसह 240 अधिकारी-कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र झपाट्याने वाढत असून ही एक चिंतेची बाब आहे .अशा स्थितीत खाण कामगारांच्या आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी या खाणीत कामगारांची तपासणी करण्यात आली आहे.