संस्कार मंदिर महाविद्यालयात ‘कोरोना महामारीचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम’ या विषयावर राष्ट्रीय ऑनलाईन चर्चासत्र

63

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
कोविड १९ चे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे.मानसांच्या जगण्याचे परिप्रेक्ष कोरोनामुळे बदलत आहे.कोरोना महामारीचा सर्वच क्षेत्रावर आमूलाग्र परिणाम होत आहे.संस्कार मंदिर संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय वारजे माळवाडी,पुणे ५८ अर्थशास्त्र विभागाच्या वतीने दि २८ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १०.०० वा ‘कोरोना महामारीचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम’ या महत्वाच्या विषयावर राष्ट्रीय ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले आहे.अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डाॅ दीपक शिंदे हे चर्चासत्राचे संयोजन करत असून पुणे म.न.पा विरोधी पक्ष नेते,मा.उपमहापौर, संस्कार मंदिर संस्थेचे अध्यक्ष मा.दिलीप बराटे यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय ऑनलाईन चर्चासत्राचे उद्घाटन होणार असून संस्कार मंदिर संस्थेचे सचिव मा.विशाल थोरात उपस्थित राहणार आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र थोरात हे ऑनलाईन चर्चासत्राचे अध्यक्ष असून डाॅ पी.एस.कांबळे,डाॅ अनिल वावरे,डाॅ गौतम कांबळे,डाॅ वीणा तावरे,डाॅ लक्ष्मणराव साळवी इ. देशभरातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.सदर चर्चासत्रातील शोधनिबंध यु.जी.सी यादीतील नामांकित नियतकालिकात प्रसिद्ध केले जाणार आहे.तरी सर्व प्राध्यापक व इच्छुकांनी चर्चासत्रात सहभागी व्हावे असे आवाहन संस्कार मंदिर संस्थेचे अध्यक्ष मा. दिलीप बराटे यांनी केले आहे. ऑनलाईन चर्चासत्राविषयी अधिक माहितीसाठी 9970346494/7246318247/9850017495 या क्रमांकावर संपर्क साधावा.