माजी समाज कल्याण सभापती डॉ अविनाश ढोक यांचे कोरोणा संसर्गजन्य आजारामुळे निधन.. — एका वैभवशाली सावलीचा मृत्यू मनाला चटका लावून गेलाय..

963

 

प्रदीप रामटेके
मुख्य संपादक

चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती डॉ.अविनाश ढोक म्हणजे अपार मैत्रीचे केंद्र स्थान व सोज्वळ स्वभावाचे आदरपूर्वक ह्रदय.व्यक्ती लहान आहे मोठी आहे,हे न बघता त्यांनी अनेकांना मायेची सावली दिली,आधार दिला.अशा या वैभवशाली सावलीचा व आधाराचा आज कोरोणा संसर्गजन्य आजाराने चंद्रपूर सामान्य रुग्णालयात अंत झालय.त्यांचा मृत्यू मात्र मनाला चटका लावून गेला.
चिमूर तालुक्यातंर्गत मौजा शंकरपूर येथील रहिवासी असलेले डॉ.अविनाश ढोक हे बहुजन समाजातील मागासवर्गीय व वंचितांचे आधारस्तंभ होते.जात,धर्म,पंथ,लहान,मोठा,न बघता,त्यांनी अनेकांना केलेले सहकार्य,विस्मरण न होणारे आहे.याचबरोबर त्यांचा सर्वांप्रती असलेला आदरयुक्त स्वभाव अनेक गुणांचा उजाळा करते.ते शांत,समजदार,मनमिळावू,कृतीशील,सक्रीय,संवेदनशील,जागरुक,मनाचे धनी होते.
कोरोणाच्या संक्रमणतेला अनुसरून डॉ.अविनाश ढोक यांनी शंकरपूर येथील आपल्या क्लिनिक मध्ये हजारो रुग्णांवर उपचार केले व याच हजारो रुग्णांच्या उपचारा दरम्यान त्यांना कोरोणाची लागण झाली.उपचारार्थ त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मावळली.
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती असतांना त्यांनी समाजकल्याण विभागाच्या योजना अंतर्गत न्यायसंगत कर्तव्य पार पाडले होते.त्यांच्या हसतमुख,मैत्रिपूर्ण स्वभावामुळे त्यांचे अनेक मित्र जिव्हाळ्याचे झाले होते.त्यांच्या अचानक मृत्यूमुळे वंचित बहुजन समाज घटकातील नागरिकांना,समाज बांधवांना धक्का बसला.हा धक्का अनेकांसाठी प्रेरणादायी ठरो..