पाऊसा अभावी रोवणीची कामे खोळंबली

 

दिनेश बनकर / अश्विन बोदेले
प्रतिनिधी दखल न्यूज भारत

कोजबी :- ऐन पावसाळ्याच्या ऋतूमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे रोवणीच्या कामात खोळंबा निर्माण झालेला आहे.
ग्रामीण भागात एकंदरीत संपूर्ण देशाचा कणा असलेला शेती हा व्यवसाय ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात केला जातो. व याच शेतीच्या भरोशावर संपूर्ण जगाचा अन्नदाता, पोशिंदा शेतामधून अन्न पिकवत असून त्याच शेतीच्या भरोशावर संपूर्ण जिंदगीची गुजराण करीत असतो. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे आज शेती कसायला सुद्धा मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. कारण एकीकडे शेती उपयोगी साहीत्याची कमी तर दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणाचा, पावसाचा अभाव आणि पुरेशी सिंचनाची सोय सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करताना खूप अडचणी निर्माण होत आहेत . परिणामी जीवन हलाखीचे निर्माण होत आहेत. या ही परिस्थिती मध्ये शेतकरी आपली जिद्द न सोडता कुटुंबाला हातभार लागावा व संसाराचा गाडा नीट ओढता यावा याकरिता शेती कसत असतो. परंतु शेतकऱ्यांच्या या प्रयत्नावर निसर्गाने सुद्धा अवकृपा दाखवलेली आहे . दिवसेंदिवस पाण्याचे प्रमाण कमी होत चालले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मागील काही दिवसात पावसाने दडी मारल्यामुळे रोवणीच्या कामात खोळंबा निर्माण झालेला आहे. ही वास्तविकता सध्या पहावयास मिळत आहे. अशा भीषण परिस्थिती मध्ये काय करावे असा शेतकऱ्यांपुढे मोठा यक्षप्रश्न उभा ठाकलेला आहे.