नायब तहसीलदाराचा कोरोनाने झाले मृत्यू

239

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी वरोरा:- देशात सगळीकडे कोरोनाने हाहाकार माजविला आहे या कोरोना च्या महामारीने कोण? कुठे? केव्हा? कसा? कधी? आपल्याला सोडून जाईल याचा नेम नाही. वरोरा तहसील कार्यालयात कार्यरत असणारे नायब तहसीलदार अशोक सलामे (वय 54 वर्षे)यांचा कोरोनाने काल चंद्रपूर च्या खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. नायब तहसिलदार अशोक सलामे यांच्या कडे निवडणूक विभागाचे कार्य होते. त्याच्या पश्चात पती व तीन मुलं असा परीवार आहे. त्यांचे चंद्रपूर ला राहते घर आहे