चंद्रपूर जिल्ह्यात जनता कर्फ्यु लागणार! — दिनांक २१ एप्रिल ते २५,२८ एप्रिल ते ०१ में..हा जनता कर्फ्यु चा कालावधी असणार! — किराणा व भाजीपाला दुकाने बंद!

916

 

उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक

कोविड-१९ अंतर्गत प्रादुर्भावामुळे चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे व सदर रुग्णांचा मृत्यूचा दर सुध्दा आवाक्याबाहेर गेला आहे.यामुळे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यात जनता कर्फ्यु लावण्यावर निर्णय घेण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत दैनंदिन कोरोणा बाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे या संख्येला आळा घालण्यासाठी,चंद्रपूर जिल्हा प्रतिबंध करणे,कोरोणाची साखळी तोडणे,नागरिकांची गर्दी टाळणे,महत्वाचे आहे.
म्हणूनच दिनांक २१ एप्रिल ते २५ एप्रिल व २८ एप्रिल ते ०१ में या कालखंडात चंद्रपूर जिल्ह्यात जनता कर्फ्यु लागू असणार आहे.या जनता कर्फ्यु ला चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहकार्य करावे व यशस्वी करावे,अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे,मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले,जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी प्रशिध्द केले आहे.
जनता कर्फ्यु च्या काळात,औषधांची दुकाने,दवाखाने,कृषी केंद्रे,पशु खाद्य केंद्रे,बॅंक व सरकारी कार्यालये सुरू राहणार आहेत.परिक्षात्री विद्यार्थ्यांना व सोबत असणाऱ्या पालकांना सुट आहे.मात्र,त्यांच्याकडे पास असणे आवश्यक आहे.पेट्रोल,वर्तमान पत्रे,गॅस सिलेंडर,दुध,हाॅटेल पदार्थ घरपोच सेवेसाठी सुरू असणार आहेत.