गौरी मोरखडे चे सुयश

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

अकोट येथील श्री.नरसिंग विद्यालयाची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी गौरी गोपाल मोरखडे हिने नुकताच लागलेल्या निकालात घवघवीत यश संपादित केले आहे. गौरी ने एकूण ४०१ गुण मिळवले आहेत. तिच्या गुणांची टक्केवारी 80.20% एवढी असून चार विषयात तिने प्राविण्य प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे कोणतीही खाजगी शिकवणी न लावता गौरीने हे यश प्राप्त केले. ती आपल्या यशाचे श्रेय शिक्षक वर्ग व आई-वडिलांना देते.