प्रिती दरेकर यांनी लिहिले कोरोना- लाॅकडाऊन संदर्भात मुख्यमंत्र्यांना खुले पत्र.

163

 

महाराष्ट्र:- मा.मुख्यमंत्री महोदय,
सर्वप्रथम आपणास माझा साष्टांग दंडवत प्रणाम.
आम्ही महाराष्ट्रात सर्व जनतेने खुप विश्वास टाकुन महाराष्ट्राची धुरा सांभळण्याची जबाबदारी आपल्यावर टाकलेली आहे. आणि ती जबाबदारी आपण उत्तम रित्या पार पाडताना दिसत आहात. दि. 21/02/2021 रोजी आपण जनतेचे मत जाणुन घेण्यासाठी पुन्हा लाॕकडाऊन लावायचा का? असा प्रश्न विचारला होतात साहेब….आणि माझे उत्तर आहे की लाॕकडाऊन लावु नका …..
जो लाॕकडाऊन लावला तो त्वरित थांबवा कारण जर होवु घातलेल्या इलेक्शन ज्या राज्यांत होत आहे तिथेच कोरोना नाही आहे तर मग महाराष्ट्रात च कोरोना कसा काय आहे? महाराष्ट्रात कोरोनाने ठीय्या मांडलायका? आणि मग तो कोरोना चार दिव इलेक्शन साठी प्रचाराला का जात नाही आहे? मी माझे मत मांडण्यासाठी माझे हे पत्र आपणास पाठवीत आहे. मागिल वर्षी मार्चच्या पहिल्याच आठवड्यात लाॕकडाऊन चालु करण्यात आला होता. मी एकटीच नाही तर संपुर्ण देश थांबला होता, आणि अर्धे लोकं उपासमारीने गेले आणि कोरोनाच्या भितीपोटीच मरणपावले.त्या काळात सामान्य माणुस कसा जगला त्यांना कीती कष्ट सहन करावे लागले हे आपल्याला खरच नाही माहिती साहेब. आपण जरी एक सुजाण आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री असलात तरी तुम्ही कधी गरीबी जवळुन बघितली असेल असे नाही वाटत मला. घरावर पत्रे आणि कुडामातीच्या भींती त्यात अतिक्रमण केलेल्या झोपडपट्टीत माझं बालपण गेलं, यवतमाळ जिल्ह्यात उनाचा तडाखा त्यात लाॕकडाऊन मधे चारघास खाण्याचे वांदे बँकेचे हफ्ते,मुलांचे शिक्षण,लाईट बिल,दवाखाने,दुधपाणी, टीवीकेबल चा रिचार्ज,भाजीपाला आणि राशन किमान येवढ्या गरजा तरी सर्वसामान्य जनतेला असतातच आणि त्यात हा कडक लाॕकडाऊन लावलाया साहेब कसं जगायचं आता? ज्यांचं पोट व्हिडीओ शुटींग,मंडप डेकोरेशेन कॕटरींग किंवा इतर सिजनेबल कामावर अवलंबून आहे अशा लोकांना वर्षभरात उपासमारीनेच मरायची वेळ आली असती जर चार पैसे बँकेत शिल्लक नसते तर शाळा भरल्या नाहित म्हणुनवर्षभर मुलं घरात , इतर व्यवसाय आणि कामधंदे ठप्पच होते..परंतु आता जेमतेम सर्व परिस्थिती सुधारण्यावर आली होती.तर नव्याने हे कोरोनाचे सावट पुन्हा केंन्द्र सरकारने जनतेवर लादले. साहेब देशाचं सरकार जनतेला समजून नाही घेऊ शकत पण किमान तुम्ही तुमच्या राज्यातील जनतेला नक्कीच समजुन घेऊ शकता.
मुख्यमंत्री साहेब माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येवु शकतो ,परवाच तुमच्या एका विडीओ मधे मी ऐकलं की कुणीतरी चालु लाॕकडाऊन मधे पाच हजार रुपये महिना बेरोजगार भत्ता प्रतिव्यक्ती मिळावा अशी कुणीतरी तुमच्याकडे मागणी केली…..
पण त्या माणसाचं काही चुकलं असं मला तरी नाही वाटत साहेब? जर कडक लाॕकडाऊन लावायचा आहे तर ती मागणी आपण पुर्ण करावी ही माझीही विनंती आहे आपल्याला…..
Obc मोर्चा ,मराठा मोर्चा ,अमुक मोर्चा तमुक मोर्चा ipl मॕच , स्टेडीयमचं नामकरण सोहळा,निवडणुका हे सगळं होतं हे सगळं होतं तेव्हा तेव्हा कोरोना कुठे जातो साहेब?
नसतोच तेव्हा कोरोना,पण शिवजयंती आली ,बाबासाहेबांची जयंती आणि लग्न समारंभ करण्याच्या वेळेलाच कोरोना कुठुन येतो आणि कसा येतो… ज्या पद्धतीने मिडीयावाले विकले गेलेत त्याच पद्धतीने अनेक शासकिय अधिकारी विकले गेलेले आहेत. साहेब समजून घ्या आज जनता खूप त्रस्त आहे आम्ही 2020 मधे जगलो आणि आज जिवंत आहोत ते आम्हीच चारपैसे बँकेत ठेवलेहोते म्हणुन, आम्हाला साधारण जनतेला कुणी धान्याची कीटही दिली जात नाही कारण आमचं राहाणिमान उंचावलेलं आहे आम्ही आमची प्रतिष्ठा बनवलेली आहे… जी आमच्या फाटक्या परिस्थिला झाकुन ठेवते. सर्व जनतेच्या पोटापाण्याचा प्रश्न डोळ्यापुढे ठेवा आणि शेतमालाच्या भाववाढिसाठी प्रयत्न करा जो पर्यंत या देशाचा पोशींदा जिवंत आहै तो पर्यंतच हा देश जिवंत आहे. पेट्रोल गॕसचे भाव वाढवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पीक मालाला भावद्या आणि माझ्या शेतकऱ्यांना न्याय द्या.
इतर ज्या राज्यांमधे निवडणूकांचा प्रचार प्रसार चालु आहे तिथे नीर्बंध का नाहीत? तिथला कोरोना कुठे गेला? तिथे लाॕकडाऊन लावा आणि कोविडच्या कारणाने निवडणुका ही इतर परिक्षेप्रमाणे तात्काळ रद्द करा…. हा दुजा भाव लोकांमधे द्वेश निर्माण करित आहे हे मोदी साहेबांना सांगा हल्ली मोदीजी आपल्याशी विडीओ काॕलवर मनकी बात करताना दिसत आहेत…..
नेमकी मनकी बात आहे की धन की बात आहे कळायला मार्गच नाही पण सर्वसामान्यांच्या हिताचं काहीही होत नाही आहे हे मात्र नक्कीच …
प्रत्येक जण लग्न हे एकदाच होतं आणि ते थाटामाटातच व्हावं हे स्वप्न रंगवत असतो किमान त्यांच्यासाठी शंभर लोकांनातरी परवानगी द्या साहेब. लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमावर ही अनेकांचे उदर्नीर्वाह अवलंबुन आहेत साहेब. इथे प्रत्येकाला आपापल्या जिवाची परवा आहे. कुटुंबाची चिंता आहे आणि त्याच कुटुंबासाठी पोट भरण्यासाठी आता कामकाज आणि रोजगार चालु ठेवा साहेब. सायंकाळी सहानंतर कामाहुन घराकडे परतणारे कर्मचारी किंवा रोजमजुर,वाणसामान,भाजीपाला मुलांना खाऊ आणि इतर खरेदी करतात आणि आता नेमके ज्या वेळला छोट्यामोट्या उद्योगधंद्यात चार पैसे कमवायची सवड असते त्याच वेळेत सर्व दुकाने बाजार सर्वंबंद करण्याचे आदेश दिलेत हे तर मला अजिबातच पटलेले नाही आहे साहेब, कमणारा एक माणुस घराबाहेर सुखरुप जावुन घरी चार पैसे घेऊन यावा ह्यासाठी संपुर्ण परिवार वाट बघतो. परंतु एक मार्च पासुन संपुर्ण बाजारपेठ पुर्ववत करावी आणि कुठलाही असा निर्बंध जनतेवर लादु नका जो सामान्य जनतेच्या हिताचा नसावा. शंभर लोकांच्या उपस्थितीत समारंभ लग्न आणि इतर सामाजिक सोहळे होऊद्या आणि अशा ठीकाणी मास्क,सॕनिटाईजर व सोशल डीस्टंसींग अनिवार्य करा. बाकी जैसे थे चालुद्या.
मी आपणास विनंती करते की आपण माझे मत समजुन घ्याल. साहेब…

मी प्रिती दरेकर रा.वणी जि.यवतमाळ
महाराष्ट्र राज्य (MH29)
मो.न.7972514099