पोटाच्या भुकेसाठी धडपडताना तीचे शीर धडावेगळे…! महिलेचा हृदयद्रावक अंत.

419

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

कोल्हापूर : पोटाची खळगी भरण्यासाठी गोरगरीबाला काय काय करावे लागते हे या घटनेतून समोर येत आहे. कसबा बावडा येथे घडलेली ही घटना त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल कचऱ्याच्या ढिगातून काही प्लास्टिक, बाटल्या, कागद मिळते का यासाठी या माऊलीची धडपड आज तिच्या जीवावर बेतली आहे. रविवारी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात काही मिळते का या धडपडीत असलेल्या या माऊलीचे शिर जगण्याच्या या युद्धात अकल्पितपणे धडावेगळे झाले. कचरा उचलण्याच्या पोकलेनने तिला कचऱ्यासाहित बकेटमध्ये धरले आणि उचलले. यातच नेमकी तिची मान यामध्ये अडकली आणि शिर धडावेगळे झाले. कसबा बावडा लाईन बाजार येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प आवारात ही दुर्घटना घडली. या अपघातात मंगल राजेंद्र दावणे वय ६० शिवाजी पेठ कोल्हापूर येथील या महिलेचा मृत्यू झाला आहे.
विलगिकरण न केलेला कचरा हा नव्याने येणाऱ्या कचऱ्यासाठी जागा करण्यासाठी बाजूला करण्याचे काम सुरू असताना हा अपघात झाला. पोकलेनने कचरा उचलत असताना महिलेचे शिर पोकलेन मध्ये अडकले आणि कचऱ्यात इतरत्र गेले महिलेचे धड बकेटमध्ये वर आले तेव्हा ड्रायव्हरच्या ही बाब लक्षात आली. ड्रायव्हर ने काम थांबून अपघाताची माहिती संबंधितांना दिली. शाहूपुरी पोलीस आणि अग्निशामक विभागाला कळविण्यात आले तब्बल अडीच तासाच्या प्रयत्नानंतर महिलेचे शिर सापडले पोकलेन चालकाला अटक करण्यात आली आहे. मात्र वीतभर पोटासाठी जगण्याच्या या लढ्यात या माऊलीचा मात्र अंत झाला. (फोटो संग्रहित.)

*दखल न्यूज भरात*