पेंढरी परिसरातील कामथळा येथे अचानक लागलेल्या आगीत दोन घरे जळून खाक

51

 

प्रतिनिधी // तेजल झाडे

पेंढरी धानोरा तालुक्यातील पेंढरी परिसरा अंतर्गत येत असलेल्या कामथळा येथील दोन घरे अचानक लागलेल्या आगीत पूर्णतः जळून खाक झालेली आहेत .
प्राप्त माहितीच्या आधारे कामखेडा येथे दिनांक 17 /04 /2019 ला दुपारी अकरा वाजताच्या दरम्यान दोन्ही घरातील सर्व मंडळी सध्या सुरू असलेल्या मोहफुल च्या हंगामात जंगलामध्ये महाफुल वेचण्या करिता गेले होते या दरम्यान श्री. सोमजी दसुर मडावी यांच्या व त्यांच्या घराला लागून असलेल्या श्री.जंगलु सावजी हिचामी यांच्या दोघांच्याही घराला अचानक आग लागली दरम्यान गावातील सर्व लोक मोहफुल वाचण्या करिता जंगलात गेले असल्याने आगीने रौद्ररूप धारण करून दोन्ही घर व घरातील सर्व साहित्य उदा. जमा केलेले मोहफुल ,धान कपडे ,मोबाईल, खाट ,त्रिफाल ,सायकल असे घरातील सर्वच्या सर्व वस्तू जळून खाक झाले यात दोन्ही घरांची मिळून अंदाजे दीड ते दोन लाखांचे नुकसान झालेले आहे .
घटनेची माहिती मिळताच कामथळा येथील तलाठी श्री .सुभाष आडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केलेला आहे .
दरम्यान संबंधित पीडित दोन्ही परिवाराला लवकरात लवकर शासनाने आर्थिक मदत करावी असे गावातील सर्व जनतेने प्रशासनाला आर्त हाकेची विनंती केलेली आहे .