सर्प दंशाने मुंडीकोटा येथील शेतकऱ्याचा मृत्यू

 

अतित डोंगरे

मुंडीकोटा : येथील छोटेलाल कन्हैय्यालाल पारधी यांचे सर्प दंश केल्याने मृत्यू झाले असल्याचा प्रकार आज ३० जुलै रोजी त्यांचे मृत्यू झाल्याने उघड झाले.
सविस्तर असे की, छोटेलाल पारधी हे शेतावर जनावरांचा चारा गवतासाठी सकाळी ९.०० वाजता दरम्यान गेले होते.१० वाजता दरम्यान त्यांचे लक्षात आले की, त्याचे डाव्या पायाचे खुर्चीच्या काही वर काहीतरी चावले. तेंव्हा या आजूबाजूला पाहिले. त्यांना बेडूक दिसले. त्याने मला चावला असेल अशी शंका व्यक्त न करता बेडूक चावले असेल असे दुर्लक्ष केले. घरी येऊन घरच्यांना आपबिती व्यक्त केली. मुलाने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडीकोटा येथे उपचारार्थ दाखल केले. मात्र त्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना मला बेडूक चावले असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांचेवर तसा उपचार करण्यात आले. घरी तो सुखरूप आला. चांगले लागत असल्याचे सांगून स्वछास गेले. त्यानंतर काही वेळाने अस्वस्थ वाटले. तेंव्हा त्यांना पुढील उपचारार्थ नेत असतांना वाटेतच त्यांचे निधन झाले. मृतकाचे बेडूक चावल्याचे दुर्लक्ष त्यांना भोवले. आणि पुढील उपाचार न करता त्यांचे आज १२.०० वाजता दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांचे आकस्मिक निघून गेल्याने मुंडीकोटा गावात शोककळा पसरली आहे. त्यांचे मृत्यू पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा आप्त परिवार आहे.