प्रियांका अमित मिरगावकर यांनी जीवनावश्यक वस्तूंचे किटस वाटप करून जपली सामाजिक बांधिलकी

81

 

प्रतिनिधी : ओंकार रेळेकर.

चिपळूण : शहरातील रॉक फिटनेस जिम व द पार्ट पार्टी हाऊस या प्रसिद्ध फार्म हाऊसच्या संचालिका सौ प्रियांका अमित मिरगावकर यांनी अन्नधान्याचे किटस वाटप करून सामाजिक बांधिलकी जपल्याचे दिसून आले.
दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन मध्ये गोरगरीब व गरजू अन्नधान्यापासून वंचीत राहू नयेत यासाठी त्यांनी २०० किटस वाटपाचे आयोजन केले आहे.सदरचे वाटप रविवार १८ एप्रिल पासून रॉक फिटनेस जिम समोर,वांगडे मोहल्ला शेजारी,बहादूरशेखनाका याठिकाणी तीन-चार दिवस करण्यात येणार आहे.पहिल्या दिवशी त्यांनी ६० किट्स वाटप केले. यावेळी लाभार्थ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले व त्यांच्या पुढील कार्यास आशीर्वाद दिले.
मिरगावकर यांच्याकडून जिद्द मतिमंद मुलांच्या शाळेत मदतीचा हात,कोरोनाच्या महामारीत जिममध्ये मोफत प्रवेश,शरीरसौष्ठव स्पर्धा,क्रिकेट स्पर्धा आयोजन,अनाथांना मदत असे विविध उपक्रम यापूर्वी राबविण्यात आलेले आहेत.

दखल न्यूज भारत