नगरपरिषद आरमोरी येथील विविध समस्या तात्काळ सोडवा नगरसेवक मिलींद खोब्रागडे

57

 

सदाशिव माकडे (८२७५२२८०२०)

आरमोरी:-
सध्या स्थितीत कोरोणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पालिकेने आरमोरी च्या जनतेच्या सहकार्याची भूमिका घेऊन संपूर्ण प्रभागात तसेच निरंतर सेवा देणारे दवाखाने आणि अत्यावश्यक सेवा पुरवीत असलेली अशी सर्व आस्थापने यात त्वरित सॅनिटायझर फवारणी करावी त्याचप्रमाणे कोरोणाच्या काळात नगरपरिषदेच्या हद्दीतील जनतेची काळजी घेणे हे पालिकेचे कर्तव्य आहे आणि त्यामुळे त्यांना स्वच्छ पाणीपुरवठा व नियोजित पाणीपुरवठा करणे आवश्यक असल्याने, सार्वजनिक विहिरी हातपंप यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकावे. त्याचप्रमाणे नगरपालिकेने उभारणी केलेल्या सौरऊर्जा लघुपाणी पुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाक्या साफ करण्यात याव्यात. उन्हाळा सुरू झाल्याने सगळीकडे पाण्याची पातळी खालावली आहे विहिरी हातपंप यांनासुद्धा पाण्याचा साठा कमी झाला असल्याने, पालिकेने ज्या हातपंपाची पाण्याची पातळी कमी झाली आहे, त्याचप्रमाणे काही बोरवेल मधून लाल पाणी येत आहे अशा हात पंपांना फ्लशिंग करून त्यातील गाळ साफ करून काही हात पंपाची खोली कमी आहे अशाची खोली वाढवावी. नगरपरिषदेने वारंवार खंडित होणाऱ्या पाणीपुरवठा बाबत योग्य नियोजन करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावे. वातावरणाच्या बदलाने नेहमी नदीवरील पाणीपुरवठा जॅकवेल वरील लाईट वारंवार जात असल्याने, पाण्याची टाकी पूर्णपणे भरत नाही आणि त्यामुळे पाणीपुरवठा नेहमी खंडित होत असते त्याकरिता तात्काळ जॅकवेल वरील विहिरीवर सोलर पंप बसवावे त्याचप्रमाणे फिल्टर वर सुद्धा सोलर बसवून नियमित पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करावे.
त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी पाण्याची खूप अडचण निर्माण होत आहे अशा ठिकाणी पालिकेने टँकरने पाणीपुरवठा करावा आणि पाण्याची अडचण दूर करावी. अशा विषयाचा पत्र देऊन मुख्याधिकारी यांच्यासोबत चर्चा केली.
जनतेच्या समस्या पालिकेने तातडीने सोडवाव्या अशा सूचना नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी केली आहे त्याच प्रमाणे जनतेने आपले आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी आणि पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.