भावांनो!…..गडचिरोली शहरात विनाकारण बाहेर फिरल्यास तुम्हाला पकडून करतील तुमची…………यासाठी बातमी वाचा

446

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी नागपूर

गडचिरोली : महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने 15 एप्रिलपासून ते 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी केेली आहे. परंतु शासनाचे संचारबंदीचे नियम पायदळी तुटवून गडचिरोली शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची सक्तीने कोविड तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. तपासणीत जो कुणी कोरोना बाधित आढळून येईल त्याची थेट विलगीकरणात रवानगी केली जाणार आहे. कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पाउले उचलली आहेत. मात्र तरीसुध्दा नागरिकांमध्ये कोणत्याही कोविडविषयी कोणत्याची प्रकारची भिती नसून गडचिरोली शहरात मोकाट फिरतांना दिसत आहेत. त्यामुळे गडचिरोली शहरात कोणत्याही कामाविना, विनाकारण फिरणारे वाहनचालक, पायी चालणारे नागरिक यांची कोविड तपासणी डाॅ. सुनिल मडावी आणि नगरपरिषदेेचे मुख्याधिकारी ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनात केली जात आहे. कोविडचा प्रसार गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ शनिवार दि. 17 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास स्थानिक मुख्य इंदिरा गांधी चैकात करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ओव्हाळ, डाॅ. सुनिल मडावी, गौरव डोंगरे, रायपूरे, निकेश गंधेवार, वैष्णव गडपायले, मयुर कोडापे आणि पोलिस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
तसेच मोकाट फिरणाऱ्यांची वाहने जप्त करण्याची आवश्यकता असल्याचे व्यक्त केले जात आहेत. अनेक जिल्ह्यात अशी मोहिम राबविली जात असल्याने विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना आळा बसल्याचे दिसून येत आहे. म्हणुन याबाबतची स्थानिक पोलिस प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.