बोरी येथे कोविड (१९) नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई

119

 

रमेश बामनकर/अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी– कोरोना विषाणूचा वाढता संक्रमण टाळण्यासाठी राज्य शासनाने १४एप्रील रात्री ८ वाजता पासून संचारबंदी लागू केली आहे.मात्र गडचिरोली जिल्ह्यातील अनेक बेरोजगार नागरिक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह साठी तेंलगणा राज्यात मेबूदाबाद जिल्ह्यातील डोरनाकड येथे जाऊन मीरची तोडून रोजगार मिळवून कसे बसे आपले कुटुंबीयांचे पोट भरायचे मात्र राज्य शासनाने संचारबंदी लागू केली हे कळताच चामोर्शी येथील मजूर जे तेंलगणा राज्यात मेबूदाबाद जिल्ह्यातील डोरनाकड येथून परत आपल्या स्व गावी चामोर्शी येथे येत असताना बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती नाक्या जवळ वाहन क्रमांक MH 33-T1058 चे चालक व मालक विलास सद्दूलवार यांनी मंजूर वर्गाला भर गच्च भरुन आपल्या वाहनात नेत होते यात महसूल विभागाने सदर चालकावर कोविड (१९) नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई केली यावेळी अहेरी चे नायब तहसिलदार श्री अनिल गुहे,श्री फारूक शेख, पोलीस अंमलदार श्री नानाजी सोमनपल्लीवार, कोतवाल श्री विनोद दहागावकर हे उपस्थित होते विशेष म्हणजे महसूल विभागाने १४एप्रीलच्या रात्री ८वाजता पासून ते १७ एप्रिलप पर्यंत कोविड( १९) नियमाचे उंल्लघन करणाऱ्या २२ नागरीक व वाहन चालकांवर कारवाई केले असल्याचे नायब तहसीलदार यांनी सांगितले आहे