उपचारा विनाच,कोरोना ग्रस्ताचा प्रवाशी निवाऱ्यात मृत्यू… — मन शून्य करणारी घटना घडलीय ब्रम्हपूरी शहरात..

229

 

संगीता सावरकर/दिक्षा ललिता
कार्यकारी संपादक

आंभोरा येथील एका ३४ वर्षीय युवकाचा कोरोनातंर्गत उपचारा विनाच ब्रम्हपूरी येथील ख्रिस्तानंद चौकातील प्रवाशी निवाऱ्यात मृत्यू झाल्याची मन शून्य करणारी घटना रविवारी घडली आहे.
सध्या कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. दवाखान्यात कोठेही बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना दारोदार फिरून शेवटी दम सोडण्याची वेळ येत आहे.असे चित्र चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या नामदार विजय वडेट्टीवार यांच्या गृह नगरातंर्गत ब्रम्हपुरीत बघायला मिळाले आहे.
कुही तालुक्यातील मौजा आंभोरा येथील गोवींदा बळीराम निकेश्वर हे ३४ वर्षीय तरुण कोरोना संक्रमित असल्याने त्याने आपल्या परिसरातील दवाखान्यात भटकंती केली,पण बेड शिल्लक नसल्याने त्याला ब्रम्हपुरीचे नाव कोणीतरी सांगितले व त्याने स्वतः पत्नी, व वृध्द आईवडीलांसोबत किरायाच्या गाडीने शनिवारी ब्रम्हपुरी गाठली पण येथेही कोणत्याच दवाखान्यात बेड शिल्लक नसल्याने त्यांनी शेवटी ब्रम्हपूरी येथील प्रवासी निवाऱ्याचा आधार घेतला.
कोठेतरी सोय होईल या आशेने ते थांबले होते.परंतू रविवारी सकाळी आमचे प्रतिनिधी फिरावयास गेले असता त्यांना ही गोस्ट लक्षात येताच,त्यांनी तात्काळ तहसीलदार विजय पवार यांना महिती दिली.माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी घटनास्थळी धाव घेतली व स्वतः तहसीलदार विजय पवार यांनी रुग्णवाहिका बोलवून त्याची कुठेतरी सोय करून त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केले पण रुग्णवाहिका येण्यापूर्वीच त्याने प्राण सोडला व या घटनेने सर्वत्र मन सुन्न झाले.
ख्रिस्तनांद रुग्णालयातील डॉ. कडून शहानिशा करून नगरपरिषद चे कर्मचारी सदर इसमाचा मृतदेह अंत्यसंस्कार साठी घेऊन गेले.अशा घटना पुन्हा घडू नये या संबंधाने पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी संसर्गजन्य कोरोणा बाधीतांच्या बाबतीत गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी सर्व स्तरावरुन होत आहे.तद्वतच उपचारासाठी विना कोणाचा जीव जाऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरीक करीत आहेत.