नगरपरिषद मधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

46

 

अकोट प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्र भीम जयंतीचा हा दिवस म्हणजे १४एप्रिल ‘ज्ञान दिन’ म्हणून देखील साजरा केला जातो. २०१७सालपासून महाराष्ट्रामध्ये या ‘ज्ञान दिवस सेलिब्रेशन’ची सुरूवात झाली. त्यांच्या विचारांचा, शिकवणीचा वसा पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा एक महत्त्वाचा दिवस आहे. परंतू यंदा अवघं जग कोरोना व्हायरसच्या जागतिक आरोग्य संकटाचा सामना करत असताना हे सेलिब्रेशन यंदा पुन्हा सामुहिकरित्या एकत्र येऊन न करता वैयक्तिक पातळीवर करण्याची गरज आहे य.त्यानिमित्त प्रशासनाने काही नियमावली करून उत्सव साध्या प्रमाणे घराघरात साजरे करण्याचे आवाहन केले. काही ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन नगर पालिकेचे नगर अध्यक्ष हरिनारायन माकोडे व विवेक बोचे यांनी केले.यावेळी नितीन वाघ व कर्मचारी आदी उपस्थित होते.