अवैध मुरुम तस्करी करणाऱ्या चार ट्रॅक्टर व जेसीबी ला ठोठावला दंड चारही ट्रॅक्टर आष्टी येथील तर जेसीबी उमरीची चामोर्शी तहसीलदार यांच्या कारवाईने रेती व मुरुम तस्करांचे धाबे दणाणले

521

 

उपसंपादक/अशोक खंडारे
दखल न्यूज भारत

चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे अवैध मुरुम तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यावर तहसीलदार सिकतोडे यांनी शासकीय वाहनाने न येता दुचाकी ने येउन आलापल्ली मसाहत च्या हद्दीतील अवैध मुरुम तस्करी करणाऱ्या चार ट्रॅक्टर व जेसीबी ला रंगेहाथ पकडून कारवाई केली.
सदर चारही ट्रॅक्टर मध्ये जेसीबी च्या सहायाने मुरुम भारतीय असताना त्यांना ताब्यात घेऊन महसूल मंडळ येथे जप्त करुन ठेवन्यात आले आहेत.
सतीश दिलीप शेळके यांची ट्राक्टर नंबर MH33 V3732 ट्राली क्रमांकMH33 3732, गुरुदास देवराव जयपुरकर MH 34 F 3571 ट्राली MH 34 M6688 , सतिश चंद्रशेखर कुंदोजवार MH33 F 4349 ट्राली MH33 V3154 दशरथ बोरकुटे MH33 F 2151 ट्राली MH33G 3279, तर हेमराज संजय भगत रा.उमरी यांची जेसीबी वाहन क्रमांक MH 29 V2370 या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.अकरा लाख चोविस हजार रुपये दंड ठोठावला आहे
हि कारवाई करतेवेळी तहसीलदार सिकतोडे तलाठी सचिन गुरनूले पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले, सहायक पोलिस उपनिरीक्षक संघरक्षीत फुलझेले उपस्थित होते.