३ दिवसापासुन वणीत लसिकरन ठप्प, नागरीकांची पायपीट

121

 

वणी : परशुराम पोटे

मागणी पेक्षा अतिशय अल्प पुरवठा होत असल्याने वणीत लसिकरनाला ब्रेक लागला असुन लसिकरन प्रक्रिया पुन्हा ३ दिवसापासुन ठप्प पडली आहे. परिणामी दररोज लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरीकांना आल्यापावली परत जावे लागत आहे.
येथिल ग्रामिण रुग्णालयात शुक्रवारी दि.१६ एप्रिल रोजी लसीचा पुरवठा समाप्त झाला परंतु ३ दिवस लोटुनही अजूनपर्यंत लस उपलब्ध करूण्यात आली नाही. परिणामी लसिकरनाला येणारे नागरिक ग्रामिण रुग्णालयातुन आल्यापा‌वली परत जातांना दिसुन येत असले तरी लसी उपलब्ध झाल्यानंतरच लसिकरनाला सुरुवात करण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे.

मागणीपेक्षा अल्प लसीचा पुरवठा

शहरासह ग्रामिण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळुन येत असल्याने ४५ वर्षावरील प्रत्येक नागरीकांनी लस घेण्याचे आवाहन करण्यात येत असल्यामुळे ग्रामिण रुग्णालयात लसिकरनाला गर्दी होऊ लागली, परिणामी मागणीपेक्षा अल्प प्रमाणात मिळत असलेला लसिंचा पुरवठा कमी पडु लागला आहे. मागणी जास्त आणि लसीचा पुरवठा अल्प होत असल्याने ग्रामिण रुग्णालय प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे.