समाजाने फिनिक्स पक्षासारखी भरारी घ्यावी प्रा. डॉ. भारत पांडे

123

उपसंपादक अशोक खंडारे /प्रतिनिधी प्रविण तिवाडे

कोविंड च्या ताडे बंदी मध्ये देशातील सर्वच लोकांची आर्थिक व्यवस्था बिघडलेले असून पुन्हा सूर्य उगवेल अंधार नष्ट होईल या आशेवर समाजाने विश्वास ठेउन एकमेकाला मानसिक आधार देऊन फिनिक्स पक्षाप्रमाणे उडण्याचे आव्हान प्रा. डॉ. भारत पांडे यांनी ओम विकास बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर द्वारा भगतसिंग चौक आष्टी येथे कपडा वाटप च्या वेळी केले. भारतीय समाज हा दानशूर असून केवळ शासनाच्या मदतची वाट न पाहता समाजाने आपापल्या परीने प्रत्येक गरजू व्यक्तीला मदतही करण्याचे आव्हान प्रा. डॉ. भारत पांडे यांनी केलेले आहे. कोविंड टाळेबंदी पूर्वीपासूनच आष्टी पेपर मिल येथील उत्पादन बंद असल्यामुळे ठेकेदारी पद्धतीमधील मजदूर लोकांची उपासमारी होत असून त्यातच टाळेबंदी आल्यामुळे आष्टी परिसरातील लहान-मोठे व्यापारही बंद असल्यामुळे दैनंदिन रोजी वर काम करणाऱ्या मजुरांच्या जीवन जगण्याच्या प्रश्न निर्माण झालेला असून त्यांना थोडा आधार म्हणून ओम विकास बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर द्वारा समाजातून कपडा गोळा करून भगतसिंग चौक आष्टी येथे कपड्याचे वाटप करण्यात आले त्याच बरोबर दानशूर व्यक्तींना समाजाला मदत करायची असेल तर संस्थेला संपर्क करण्याचे आव्हान प्रा. डॉ. भारत पांडे यांनी समजला केलेले आहे सामूहिक कपडा वाटप करण्याकरिता श्री संतोष नागरगोजे ,श्री दीपक पंदीलवार ,श्री आकाश अलकिवार , श्री आशिष झाडे श्री प्रवीण तिवाडे , व्‍यंकटी बुरले व अन्य गावकऱ्यांनी सहकार्य केले