आखिल भारतीय सेना पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. —–: शनिभाऊ शिंगारे आखिल   भारतीय सेना अध्यक्ष यांच्या शुभास्ते हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले :::—–

166

 

निरा नरसिंहपूर, दिनांक :17 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार, 

नीरा नरसिंहपूर तालुका इंदापूर येथे ग्रामपंचायत कार्यालया शेजारी रक्तदान शिबिराचे आयोजन अखिल भारतीय सेना पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने व  मुक्ताताई ब्लड बँक इंदापूर यांच्या प्रयत्नाने रक्तदान  शिबिर घेण्यात आले . या शिबिराचे उद्घाटन व प्रमुख उपस्थिती अखिल भारतीय सेना पुणे जिल्हा अध्यक्ष शनीभाव शिंगारे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले. संपूर्ण जगामध्ये भारत देशावर व महाराष्ट्र राज्यमध्ये कोरोणा रोगाचे  महाभयंकर संकट निर्माण झाल्यामुळे रक्ताचा तुटवडा होऊ नये  त्या निमित्ताने तुटवड्याला  सामोरे जाण्यासाठी एक पाऊल देशासाठी म्हणून अखिल भारतीय सेना पुणे जिल्हा अध्यक्ष शनीभाऊ शिंगारे यांच्या प्रमुख उपस्थित रक्तदान शिबिर  घेण्यात आले . एकूण रक्तदान 51 ग्रामस्थाने केले तर यांना प्रत्येकी एक टीशर्ट व केळी चहा बिस्किटही देण्यात आली.रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमासाठी

पुणे जिल्हा अध्यक्ष शनिभाऊ सिंगारे, माजी सरपंच श्रीकांत दंडवते, माजी सरपंच आण्णासाहेब काळे, विद्यमान उपसरपंच विठ्ठल देशमुख, भैय्यासाहेब बंडगर, निलेश कोळी, किशोर जाधव, धनंजय पवार, तात्यासाहेब जाधव, अक्षय गोडसे, विकी निंबाळकर, दीपक जाधव हे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आयोजन इंदापूर तालुका आखिल भारतीय सिनेचे युवक अध्यक्ष निलेश मामा कोळी यांनी केले .

————————————————-

फोटो:- ओळी- नीरा नरसिंहपूर येथे रक्तदान शिबिर यामध्ये रक्तदान करीत असताना  ग्रामस्थ.

 

 

 

 

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160