मुंडीकोटा गावातील वार्ड क्र. तीन कोरोनाबधित क्षेत्र घोषित : एक व्यक्ती कोविड १९ ने बाधित

0
114

 

अतित डोंगरे

तिरोडा : मुंडीकोटा येथील एक युवक कोरोनाग्रसीत असल्याचे आज अधिकृतपणे घोषित करण्यात आले. सदर बाधित रुग्ण हा टाइफाईडने आठवड्याभाऱ्यापासून होता. त्याचा स्व्याब २८ जुलै ला घेण्यात आले. त्याचा अहवाल आज ३१ जुलै रोजी आलेला असून तो कोविड १९ ने ग्रसित असल्याचे निश्चित झाले. मागील आठ दिवसात त्याचा ज्यांचेशी प्रत्यक्ष सम्पर्क आला त्यांची यादी तयार झालेली सून त्यात ३४ लोंकांचा समावेश आहे. सदर व्यक्ती अदानी कँपणीत कामाला असल्याने त्यातील २२ जणांचा समावेश आहे. तर त्याला वेळोवेळी औधोपचार घेण्यासाठी घेऊन गेलेले आणि ज्यांनी औषधोपचार दिले त्या डॉक्टरचा समावेश आहे. युवकाला कोविड १९ चा झालाच कसा याचा शोध घेतला जात आहे. युवकाची दिनचर्या ही अदानी ते घर असा असल्याने अदानीत काम करणाऱ्यांकडून तर झाला नसावा अशी प्राथमिक शंका जनमानसात व्यक्त करण्यात येत आहे.

मुंडीकोटा हे गाव बाजारपेठेचे गाव आहे. या गावाशी जवळपास ३२ गावांचा समावेश आहे. मुंडीकोटा येथील व्यापार प्रसिद्ध आहे. अश्या परिस्थित सम्पूर्ण गाव बंद करण्याचा ग्रामप्रशासनाने निर्णय घेतल्यास गावातील नव्हे तर इतर गावातील नागरिकांना, ग्राहकांना काही अडचणींचा सामना करावा लागणाऱ आहे.
आता मुंडीकोटा ग्रामप्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे जनमानसाचे लक्ष लागले आहे.