नरसिंहपल्ली येथील आरोग्य उपकेंद्र आठ महिन्यापासून बंद अवस्थेत – रुग्णांना उपचार करून घेण्यास अडचण -उपकेंद्र त्वरित सुरु करावी-जगदिश वेन्नम

111

 

संपादक//

गडचिरोली :- सिरोंचा तालुक्यातील अविकसित अति दुर्गम भागातील मोयाबीनपेठा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या नरसिहपल्ली येथील उपकेंद्र आठ महिन्यापासून बंद आहे.
नरसिहपल्ली हे गाव —- लोकसंख्या असणारे गाव तसेच या उपकेंद्र अंतर्गत— गावे येतात.या गावातील नागरिक इलाज करण्यास एकमेव असा उपकेंद्र आहे.मात्र उपकेंद्र आठ महिन्यापासून बंद असून रोग्यांना इलाज करून घेण्यास अडचणीचे जात आहे.लहान मोठे ताप, सर्दी-पडसे, हगवण असे बिमारी येईल तर खाजगी दवाखान्यातुन इलाज करावा लागत आहे.परिणामी जनतेला आर्थिक बुर्दंड व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
सद्या राज्यात महामारी संसर्गजन्य कोविड-१९ चे काळ सुरू असल्याने कोणत्याही प्रकारचे निदान खाजगी दवाखान्यात करण्यास भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे.करिता उपकेंद्र महत्वाचे असून बंद असलेले उपकेंद्र त्वरित उघडावे अशी मागणी परिसरातील जनतेने करीत आहेत.तसेच प्रसूती महिला असल्यास खाजगी दवाखान्यात जावे लागत आहे.तरी या कडे लोकप्रतिनिधी व प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत.आरोग्य सेवा दुर्गम भागात पोहोचावी म्हणून लाखो रुपयांची इमारत उभी केली आहे. आरोग्य कर्मचारी स्थानिक पातळीवर राहून आपली सेवा द्यावे.असे शासनव्यवस्था असून सुद्धा आरोग्य कर्मचारी उपकेंद्रात अनुपस्थित राहतात या गंभीर समस्याकडे संबंधित अधिकारी लक्ष केंद्रित करून उपकेंद्र त्वरित सुरू करून जनतेला आरोग्य सेवा द्यावे असे मागणी दखल न्युज भारत चे संपादक जगदिश वेन्नम सह गावकरी करीत आहेत.