महादुला कोराडी त कोरोना चा विस्फोट ११ कोरोना पाँजिटीव पेशंट आज एकाच दिवशी आढळले; महादुला कोराडीत १४ दिवस कडक लाँक डाऊन लावण्याची आवश्यकता

8809

 

सुनील उत्तमराव साळवे
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

महादुला-कोराडी / नागपुर :३० जुलै २०२०
महादुला मध्ये सध्या कोरोना संक्रमणाचा जोर असुन आज एकाच दिवशी ११ जण कोरोना पाँजिटीव पेशंट निघाले आहेत.त्यामुळे आता कोरोना चे संकट वाढले असुन याला कारणीभूत म्हणजे येथील नागरिकांचे बेशिस्त वागणे. लाँक डाऊन तोडुन विनाकारण फिरणे, पार्ट्या करणे, मास्क सेनिटायजर न वापरणे, गर्दी जमवणे, फिजीकल डिस्टेंसिंग न पाळणे यामुळेच आता महादुला-कोराडी मध्ये कोरोना चा विस्फोट वाढला आहे. याकरिता १४ दिवस कडक लाँक डाऊन महादुला नगरपंचायत ने जाहीर करावे आणि त्यामध्ये सर्व किराणा दुकाने पानठेले, हाँटेल, सब्जी मार्केट बंद ठेवावे जेणेकरून कोरोना चा संसर्ग कमी होईल आणि नागरिकांना शिस्त लागेल. कोराडी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजिर शेख तसेच महादुला नगरपंचायत चे मुख्याधिकारी संदीप छिद्रावार यांनी महादुला कोराडी हे हे हाँट झोन डिक्लेअर करण्याची व १४ दिवस कडक लाँक डाऊन करण्याची मागणी होत आहे.
दि. २९ जुलै २०२० रोजी एकुण १२२ जणांनी कोव्हीड टेस्ट करिता आपली स्वैब टेस्ट दिली होती. त्यापैकी एकुण ११ जण कोरोना पाँजिटीव निघाले आहेत. एकट्या इंदिरा प्रगति नगर, महादुला येथे ८ जण कोरोना पाँजिटीव आढळले असुन एक कोराडीतील कांन्क्टैक्टर असोशियन चे नेते आहेत. तर इतर दोन जणांपैकी एक जवाहर नगर वडार मोहल्ला व एक जण दुध डेअरी मालकाची मुलगी आहे. या परिसरात सील लावणे सुरु आहे. मात्र बास बल्ल्यासोबतच टीन ठोकून सील करावे जेणेकरून या परिसरातील लोक बाहेर पडु नये. महादुला नगरपंचायत चे मुख्याधिकारी संदीप छिद्रावार यांनी याकडे आवर्जून लक्ष घालावे.

३ जणांमुळे कोरोना संसर्गाचा धोका

कोराडी कांन्क्टैक्टर असोशियन चे नेते पाँजिटीव आढळले आहेत त्यांचा संपर्क महाजेनको, ऊर्जा भवन तसेच संपुर्ण महादुला कोराडी क्षेत्रात वावर आहे तसेच सार्वजनिक जीवनात ते एक समाजसेवक म्हणुन ही कार्यरत आहेत. काल परवा पर्यंत एका मयतीत ते गेले होते तसेच अंत्यविधी त ही ते आपल्या सहकाऱ्यांसोबत उपस्थित होते. तसेच जवाहरनगर येथील एक ३८ वर्षिय युवक ज्याला ४ दिवसापासून ताप होता तो शिवाजी नगर येथील मयतीत उपस्थित होता आज त्याचा ही रिपोर्ट पाँजिटीव निघाला आहे. त्यामुळे या दोघांकडून कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. तसेच छिंदवाडा रोडवरील एका दुध डेअरी मालकांची मुलगी पण पाँजिटीव आली आहे. त्यामुळे आता कोरोना चा खुप मोठा विस्फोट महादुला कोराडी त आता होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना ची साखळी वाढण्याची भीती आहे.