कोरोनाच्या सावटाखाली मोहझरी येथील विवाह सोहळा संपन्न

0
421

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

आरमोरी :- तालुक्यातील मोहझरी येथे आज दिनांक 17/ 4 /2021रोज शनिवारला कोरोनाच्या सावटाखाली आणि सोशल डिस्टन्स ठेवून विवाह सोहळा पार पडला

या विवाह सोहळाला तहसीलदार यांची रीतसर परवानगी घेतली होती. नवरदेव रोशन गुरनुले मुक्काम:- मसेली तालुका :- रामटेक जिल्हा:- नागपूर यांचा विवाह मोहझरी येथील ममता मोतीराम चाटाळे यांच्यासोबत विवाह पार पडला .

या विवाह प्रसंगी मोहझरी येथील धात्रक तलाठी ,टेकाम ग्रामसेवक,तुळशीदास वाढई पोलीस पाटील व इतर गाव पातळीवरील समितीच्या समक्ष अगदी कमी लोकांमध्ये हा विवाह सोहळा पार पाडण्यात आला. यावेळी सरकारी नियमाला सहकार्य घर मालक सोपान चाटाळे यांनी प्रशासनाला मदत केली. या विवाह सोहळ्याला नवरदेवाकडून फक्त 7 व्यक्ती आले होते तर बाकी दहा-पंधरा मंडळी वधूकडील होती अशा मोजक्या पाहुण्यांमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.पाहुणे मंडळींनी या विवाह प्रसंगी सॅनिटायझर आणि मास्क यांचा वापर करून नवदांपत्यांना शुभ आशीर्वाद देण्यात आला.